Vat Purnima Vrat 2024 : कधी आहे वटपौर्णिमा? वाचा तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्व
Vat Purnima 2024 :वट पौर्णिमेचा व्रत नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी राहण्यासाठी आणि सुखी वैवाहीक जीवनासाठी ठेवला जातो. या व्रतामध्ये देवी सावित्री, सत्यवान आणि वटवृक्षाचीही पूजा केली जाते. या व्रताची उपासनाही वट सावित्री व्रतासारखीच आहे.
ADVERTISEMENT
Vat Purnima Vrat 2024 : वट सावित्री पौर्णिमा दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला येते. या दिवशी विवाहित महिला व्रत ठेवून वडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात. हिंदू धर्मात वट सावित्री पौर्णिमेला (Vat Purnima Vrat) विशेष महत्व आहे. यंदाच्या वर्षी 21 जून आणि 22 जून या दोन्ही दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा आहे. त्यामुळे नेमकी आता वट सावित्री पौर्णिमा कधी आहे? या वटपौर्णिमेची नेमकी तारीख काय आहे? आणि मुहूर्त कधी आहे? हे जाणून घेऊयात. (vat purnima vrat 2024 marathi 21 june 2024 know the date timing puja muhurt shubh yog significance as per astrologer)
ADVERTISEMENT
दोन दिवस वटपौर्णिमा कशी?
वैदिक दिनदर्शिकेनुसार, वट सावित्री पौर्णिमा उपवासासाठी ज्येष्ठ पौर्णिमा तिथी या वर्षी शुक्रवार, 21 जून रोजी सकाळी 07:31 पासून सुरू होत आहे आणि शनिवार, 22 जून रोजी सकाळी 06:37 पर्यंत असणार आहे. त्यामुळे दोन दिवस वटपौर्णिमा आहे.
तिथी नेहमी सूर्योदयाच्या वेळेपासून मोजली जाते. या आधारावर, ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 22 जून रोजी आहे कारण त्या दिवशी सूर्योदय पहाटे 05:24 वाजता होईल, तर 21 जून रोजी सूर्योदय पहाटे 05:24 वाजता होईल, परंतु पौर्णिमा तिथी सूर्योदयानंतर होत आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा : मुंबईला 'ऑरेंज अलर्ट'; 'या' जिल्ह्यांना 'अति मुसळधार'चा इशारा!
तारीख काय?
वट पौर्णिमेच्या व्रतासाठी पौर्णिमेच्या तिथीला चंद्रोदय होणे आवश्यक आहे. अशा स्थितीत, कॅलेंडरनुसार, ज्येष्ठ पौर्णिमेचा चंद्रोदय 21 जून रोजी होत आहे. अशा परिस्थितीत शुक्रवार, 21 जून रोजी वट सावित्री पौर्णिमा व्रत करणे चांगले राहील.
वट पौर्णिमेचा मुहूर्त काय?
वट सावित्री पौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी 21 जून रोजी शुभ योग आणि ज्येष्ठ नक्षत्र आहे. शुभ योग सकाळपासून संध्याकाळी 06.42 वाजेपर्यंत आहे, तर ज्येष्ठ नक्षत्र देखील सकाळपासून संध्याकाळी 06.19 वाजेपर्यंत आहे. त्या दिवसाचा शुभ मुहूर्त किंवा अभिजीत मुहूर्त सकाळी 11:55 ते दुपारी 12:51 पर्यंत आहे. अशा स्थितीत वट सावित्री पौर्णिमा व्रताची पूजा शुभ योगाने करावी, ते तुमच्यासाठी शुभ राहील.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Ramdas Kadam : "शिंदे साहेब, मोदी-शाहांना सांगा", कदमांनी भाजपवरच फोडले खापर
वट पौर्णिमेचे महत्व काय?
वट पौर्णिमेचा व्रत नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी राहण्यासाठी आणि सुखी वैवाहीक जीवनासाठी ठेवला जातो. या व्रतामध्ये देवी सावित्री, सत्यवान आणि वटवृक्षाचीही पूजा केली जाते. या व्रताची उपासनाही वट सावित्री व्रतासारखीच आहे. फरक इतकाच आहे की वट सावित्री व्रत ज्येष्ठ अमावस्येला म्हणजेच वट सावित्री पौर्णिमा व्रताच्या 15 दिवस आधी पाळला जातो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT