Wedding Season Tips: लग्नात मिरवायचंय तर एवढंच करा.. सगळे बघतच राहतील!

मुंबई तक

ADVERTISEMENT

wedding season tips want to look fit and beautiful during the wedding season follow this routine
wedding season tips want to look fit and beautiful during the wedding season follow this routine
social share
google news

Wedding Season Fitness Tips: लग्नसराईचा हंगाम आता लवकरच सुरू होणार आहे. तुळशी लग्न पार पडल्यानंतर अनेकांकडे लग्नाची लगबग ही सुरू होणार आहे. त्यामुळे या काळात प्रत्येकाला खूप खास दिसायचे असते. त्यामुळे या काळात फिटनेसची विशेष काळजी घेतल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. असे बऱ्याचदा होते की, लोकांकडे या खास प्रसंगी तयारी करण्यासाठी फारच कमी वेळ असतो. पण तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. विशेष प्रसंगी, बहुतेक मुली त्यांच्या वजन आणि फिटनेसबद्दल काळजी करू लागतात. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासोबत अशा काही टिप्स शेअर करणार आहोत ज्याद्वारे तुम्ही या लग्नाच्या सीझनमध्ये सुंदर, तंदुरुस्त आणि शेपमध्ये दिसाल. (wedding season tips want to look fit and beautiful during the wedding season follow this routine)

ADVERTISEMENT

कार्डिओमुळे होईल मदत

लग्नाच्या हंगामात तंदुरुस्त दिसण्यासाठी तुम्ही कार्डिओ, धावणे, सायकलिंग किंवा नृत्य करणे महत्त्वाचे आहे. हे तुम्हाला कॅलरी बर्न करण्यास आणि वजन जलद कमी करण्यास मदत करेल. दररोज 30 ते 45 मिनिटे व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. यासोबतच हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करा.

रेझिस्टन्स ट्रेनिंग

याला स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग असेही म्हणतात. स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी हे प्रशिक्षण दिले जाते. रेझिस्टन्स प्रशिक्षण स्नायूंच्या सहनशक्तीवर लक्ष केंद्रित करते, स्नायूंचा आकार आणि ताकद वाढवते, . त्यासाठी पुश अप्स, स्क्वॅट्स आणि प्लँक्स केले जातात.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते कसे आहे? जाणून घ्या ‘या’ गोष्टीतून…

तुमच्या आहाराची काळजी घ्या

लग्नाच्या मोसमात तुम्हाला फिट दिसायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. प्रक्रिया केलेले अन्न, साखर, सोडियमचे सेवन कमी करा. त्याऐवजी शक्य तितके पातळ प्रथिने, संपूर्ण धान्य, फळे आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करा. अन्न कमी प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करा परंतु दर 2 तासांनी काहीतरी खात रहा. जास्त वेळ उपाशी राहू नका.

योगा

लग्नाच्या मोसमात घरामध्ये खूप कामं असतात. ज्यामुळे अनेकांना तणाव जाणवू लागतो. अशा परिस्थितीत तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी योगासने करणे महत्त्वाचे आहे. योग तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो आणि त्यामुळे तणावाची पातळीही कमी होते. अशा स्थितीत तुमच्या दिनचर्येत ध्यान आणि योगाचा समावेश करा.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Collagen: तीशीतही कॉलेजवयीन सौंदर्य राखण्यासाठी घरीच करा ‘हा’ गुणकारी उपाय!

विश्रांती आवश्यक

लग्नाच्या हंगामात, आपण आपल्या फिटनेस तसेच विश्रांतीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. लग्नाच्या तयारीच्या धामधुमीत, तुम्ही पुरेशी विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे, यामुळे तुमच्या शरीराला सावरायला वेळ मिळेल. यासोबत हलक्या अॅक्टिव्हिटी देखील करत राहा. पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुमच्या त्वचेवर चमक येईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT