Power Nap : कामाच्या तणावात एक छोटी डुलकी, शरीरासाठी कशी ठरते फायदेशीर?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

What are the Health Benefits of Power Nap Get know about it Will helpful to you
What are the Health Benefits of Power Nap Get know about it Will helpful to you
social share
google news

Health Benefits of Power Naps : निरोगी आणि उत्साही राहण्यासाठी पुरेपूर झोप घेणं खूप गरजेचं आहे. चांगली झोप म्हणजे निरोगी जीवन असं म्हटलं जातं. यात जर कामाच्या तणावात एक छोटी झोप (Sleep) मिळाली तर आपला दिवस चांगला जाऊ शकतो. पण काहींना दुपारी घेतलेली छोटी डुलकी रात्रीच्या झोपेवर परिणाम करेल असे वाटते म्हणून बरेच जण ते टाळतात. याला पॉवर नॅप्स (Power Nap) असं म्हणतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. (What are the Health Benefits of Power Nap Get know about it Will helpful to you)

बऱ्याच देशांमध्ये पॉवर नॅपचा समावेश दैनंदिन रूटीनमध्ये केला जातो. स्पॅनिश लोक दिवसातून एकदाच झोप घेतात. काही जपानी कर्मचारी दुपारच्या जेवणानंतर पॉवर नॅप घेतात. गुगल, सॅमसंग आणि फेसबुकसारख्या कंपन्यांच्या कार्यालयात नॅप पॉड्स बनवण्यात आले आहेत, जेणेकरून कर्मचाऱ्यांना कामातून 15 ते 20 मिनिटं हलकी झोप घेता येईल.

वाचा : BMC: शिंदे-भाजपच्या आमदारांना कोट्यवधी.. ‘मविआ’च्या आमदारांचे हात रिकामेच’!

पॉवर नॅपिंगचा ट्रेंड जगभरात वाढत आहे. पण दिवसभरात एक छोटी डुलकी खरंच फायदेशीर ठरते का? यामुळे तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटते की तुम्हाला जास्त थकवा जाणवतो? हे सर्व आज आपण सविस्तर जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पॉवर नॅपचे फायदे कोणते?

संशोधनात असे दिसून आले आहे की, दिवसातून 15 ते 20 मिनिटं घेतलेली डुलकी आपल्या मेंदूच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी चांगली असते. संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, पॉवर नॅप दीर्घ काळासाठी आपल्या मेंदूला चालना देण्यास मदत करू शकते.

वाचा : Nashik: ‘खर्चासाठी पैसे देत नाही’; पतीचा काटा काढण्यासाठी बियर पाजली, सर्पदंश देऊन…

बुद्धीला चालना देण्यास मदत होते

संशोधकांनी 40 ते 69 वयोगटातील 35,000 लोकांच्या डेटाचे विश्लेषण केले. संशोधनात असे आढळून आले की जे लोक आठवड्यातून अनेक वेळा डुलकी घेतात त्यांचा मेंदू दिवसभरात कधीही झोप न घेणाऱ्या लोकांच्या मेंदूपेक्षा 15 क्युबिक सेमी मोठा होता. मोठी गोष्ट अशी होती की दिवसा डुलकी घेणे मोठ्या प्रमाणात मेंदूच्या आकाराशी संबंधित आहे. वयोमानानुसार मेंदू आकुंचन पावू लागतो आणि मेंदूचा आकार लहान असल्याने अनेक आजार होतात. ज्या लोकांच्या मेंदूचा आकार कमी आहे त्यांच्यात तणावाचे हार्मोन कॉर्टिसॉल जास्त प्रमाणात असण्याची शक्यता असते.

ADVERTISEMENT

मेंदूसाठी 15 ते 20 मिनिटांची डुलकी आवश्यक

15 ते 20 मिनिटांची छोटी डुलकी तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी मदत करू शकते. ही पॉवर नॅप लोकांना गाढ झोपेत जाऊ देत नाही, हे तेव्हा होते जेव्हा शरीर ऊतींची दुरुस्ती करून ते पुन्हा विकसित करते. पॉवर नॅप नेहमी 30 मिनिटांपेक्षा कमी असावी आणि हे दिवसातून एकदाच केले पाहिजे. जर तुम्ही वारंवार पॉवर नॅप घेत असाल तर ते तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसल्याचे लक्षण आहे.

ADVERTISEMENT

वाचा : Maratha Reservation: जरांगे भुजबळांवर भडकले, ‘तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तू…’

पॉवर नॅप हा आपल्या रूटीनचा भाग असावा का?

तुम्ही पॉवर नॅपला तुमच्या रूटीनचा एक भाग बनवू शकता. पॉवर नॅप घेतल्याने मूड चांगला राहतो, जे एकाग्रतेने काम करण्यास मदत करते. पॉवर नॅप 15 ते 20 मिनिटं घ्यावी यासाठी नेहमी शांत जागा निवडा. जर तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत शिफ्ट करत असाल, तर तुमच्यासाठी पॉवर नॅप घेण्याची योग्य वेळ दुपारच्या जेवणानंतर असेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT