Israel-Palestine War: फक्त 41 किमी जमिनीच्या तुकड्यासाठी रक्ताचे पाट, काय आहे गाझापट्टी?
इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांच्या मध्ये असलेली गाझापट्टी काय आहे? गाझापट्टीवरून का सुरू आहे वाद? गाझापट्टी नेमकी कुठे आहे?
ADVERTISEMENT

Gaza strip on map : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही बाजूंच्या शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या युद्धाच्या घोषणेनंतर इस्रायलचे लष्कर आणि हवाई दल हमासच्या दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत आहेत. गाझा पट्टीवर सातत्याने रॉकेट हल्ले होत असून, त्यावर इस्रायल नेहमीच आक्रमक राहिला आहे. काय आहे गाझा पट्टी? आणि यावरून इस्रायल आणि पॅलेस्टाईन अनेक दशकांपासून संघर्ष का करताहेत? (what is Gaza Strip? And why Israel and Palestine have been coming face to face)
गाझा पट्टी म्हणजे काय?
गाझा पट्टी हा इस्रायल, इजिप्त आणि भूमध्य समुद्राच्या मधोमध असलेला एक छोटासा भूभाग आहे, जो जगातील सर्वात दाट लोकवस्तीचा भाग म्हणूनही ओळखला जातो. हमास ही दहशतवादी इस्लामिक पॅलेस्टिनी संघटना गाझामधूनच इस्रायलवर हल्ले करत आहे. गाझा पट्टी हे अंदाजे दहा किलोमीटर रुंद आणि 41 किलोमीटर लांबीचे क्षेत्र आहे आणि 2 दशलक्षाहून अधिक लोकांचे निवासस्थान असलेले ठिकाण आहे.
याचा अर्थ प्रति चौरस किलोमीटर सरासरी सुमारे 5,500 लोक राहतात. इस्रायलबद्दल बोलायचे झाल्यास, येथे सरासरी लोकसंख्येची घनता सुमारे 400 लोक प्रति चौरस किलोमीटर आहे, ज्यावरून गाझा किती दाट लोकवस्ती आहे हे समजू शकते.

40 टक्के लोकसंख्या 15 वर्षांपेक्षा कमी वयाची
गाझा पट्टीत राहणारे लोक पॅलेस्टिनी आहेत. येथे राहणाऱ्या लोकांमध्ये मूळ रहिवासी आणि निर्वासितांचा समावेश आहे. 1948 मध्ये इस्रायलची स्थापना झाल्यानंतर आणि त्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील लष्करी संघर्षानंतर निर्वासित गाझामध्ये पळून गेले. येथे राहणारे बहुतेक लोक उत्तरेकडे, विशेषतः गाझा शहरात राहतात. येथील लोकसंख्या खूपच तरुण आहे, सुमारे 40% लोकसंख्या 15 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे.