Whatsapp वरच Youtube! मोठे व्हिडीओ बघता येणार, काय आहे नवे फीचर?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

WhatsApp will get a special feature like YouTube long videos can be seen in a Minutes
WhatsApp will get a special feature like YouTube long videos can be seen in a Minutes
social share
google news

WhatsApp New Feature : व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरू शकते. अलिकडेच व्हॉट्सअ‍ॅपने एक खास फिचर जारी केले आहे जे यूजर्सना कमीतकमी 31 जणांसह ग्रुप कॉल करण्यास परवानगी देते. आता या प्लॅटफॉर्मवर आणखी एक नवीन फिचर आले आहे जे व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडीओ पाहण्याची मजा आणखी द्विगुणित करेल. एका नवीन ऑनलाइन अहवालानुसार, हे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप फॉरवर्ड आणि बॅकवर्ड व्हिडीओंना स्किप करण्याचा फिचर आणत आहे. (WhatsApp will get a special feature like YouTube long videos can be seen in a Minutes)

Youtube प्रमाणे असणार हे खास फिचर!

नवीन फिचर यूजर्सना त्यांच्या स्क्रीनच्या डावीकडे किंवा उजवीकडे डबल-टॅप करून सहजपणे व्हिडीओ स्किप करण्याची सुविधा देईल. तुम्ही YouTube वर व्हिडीओ कोणत्याही अडचणीशिवाय फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड करू शकता असंच हे फिचर ही आहे. नवीन व्हिडीओ स्किप फिचरसह, यूजर्स आता मेसेज बॉक्समध्ये आलेले किंवा पाठवलेले व्हिडीओ सहजपणे नेव्हिगेट करू शकतात. याचा अर्थ तुम्ही आता व्हिडीओ पाहताना फॉरवर्ड करू शकता किंवा न पाहिलेला भाग पाहण्यासाठी रिवाइंड करू शकता.

विशेषत: व्हॉट्सअ‍ॅपवर लांबलचक व्हिडिओ पाहणे म्हणजे वेळ वाया जातो. अनेक वेळा हे व्हिडीओ पूर्ण पाहणे युजरसाठी नाइलाज असतो. व्हॉट्सअ‍ॅपवरील लांबलचक व्हिडीओचा कोणताही भाग वगळणे आणि पुढे ढकलणे हा एक पर्याय होता, परंतु यामुळे काही महत्त्वाचे भाग वगळले जाऊ शकतात. नवीन अपडेटमुळे युजर्सची ही समस्या लवकरच दूर होणार आहे. या फिचरच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप यूजर 10 सेकंदांचे अंतर देऊन मोठे व्हिडीओ फॉरवर्ड आणि बॅकवर्ड करू शकतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

व्हॉट्सअ‍ॅपवरील हे अनोखं फिचर कधी होणार सुरू?

व्हॉट्सअ‍ॅपचे हे फिचर सध्या अँड्रॉईड बीटा यूजर्ससाठी उपलब्ध आहे. यूजर्स प्ले स्टोअरवरून WhatsApp चे अपडेटेड व्हर्जन 2.23.24.6 इंस्टॉल करू शकतात. हे फिचर लवकरच व्हॉट्सअ‍ॅपच्या इतर यूजर्ससाठीही अपडेट होईल. या फिचरमुळे, यूजर्सना त्यांच्या व्हिडीओ प्लेबॅकवर अधिक नियंत्रण मिळेल. नवीन फिचर सेम टू सेम यूट्यूब व्हिडीओ फिचर सारखे असल्याने यूजर्सना ते वापरणे सोपे होणार आहे. हे केवळ वेळेची बचत करणार नाही तर कंटेंट नेव्हिगेशन देखील सुधारेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT