Indira Gandhi कमलनाथांना का म्हणायच्या तिसरा मुलगा? स्टोरी आहे खूपच खास

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Congress : Kamal Nath : कमलनाथ यांची एकेकाळी काँग्रेसच्या बड्या नेत्यांमध्ये गणना होती. संजय गांधी यांच्याशी त्यांची खास मैत्री होती. इंदिरा गांधी त्यांना आपला तिसरा मुलगा मानायच्या, एवढं सगळं असतानाही कमलनाथ आता काँग्रेस सोडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. ते कधीही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. असं झाल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससाठी हा आणखी एक मोठा धक्का असेल. (Why did Indira Gandhi call Kamal Nath her third son Know the interesting story behind it)

ADVERTISEMENT

कमलनाथ भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता का वर्तवली जातेय? 

राज्यसभेचे तिकीट न दिल्याने मध्य प्रदेशातील काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ पक्ष बदलण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर त्यांच्या डोक्यावर घालण्यात आले. त्यांचे मत न घेता प्रदेशाध्यक्ष निवडला गेला. एक प्रकारे त्यांना काँग्रेसने डावलले. या सर्व गोष्टींमुळे कमलनाथ दुखावले गेले. तसंच त्यांचा मुलगा खासदार नकुल नाथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून काँग्रेसचा लोगो हटवला आहे. या सर्व गोष्टींमुळे ते काँग्रेस सोडतील असं म्हटलं जातंय.

कमलनाथ यांनी इंदिरा गांधींचा जिंकला होता विश्वास

हे वाचलं का?

कानपूरच्या व्यापारी कुटुंबात जन्मलेले कमलनाथ हे संजय गांधी यांचे दून स्कूलमधील वर्गमित्र होते. इथून दोघांची मैत्री झाली. यामुळे कमलनाथ गांधी कुटुंबाच्या जवळ आले. ते केवळ संजय गांधींचेच मित्र नव्हते तर राजीव गांधी यांच्याही जवळचे होते. 

संजय आणि राजीव गांधी यांच्यानंतर ते सोनिया गांधींसोबतही तितकेच विश्वासू राहिले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांना त्यांचा तिसरा मुलगा मानत असे. कमलनाथ यांचे इंदिरा गांधींसोबतचे नाते फार खास होते. 1979 मध्ये मोरारजी देसाई यांच्या सरकारविरुद्धच्या लढतीत कमलनाथ यांनी उत्कृष्ट भूमिका बजावली होती. यामुळे इंदिरा गांधी प्रभावित झाल्या होत्या.

ADVERTISEMENT

छिंदवाडामधून पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली

1980 मध्ये छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने कमलनाथ यांना पहिल्यांदा उमेदवारी दिली. कमलनाथ यांच्या नामांकनाच्या वेळी इंदिरा गांधी स्वतः छिंदवाडा येथे पोहोचल्या होत्या. त्यावेळी त्यांनी कमलनाथ यांना त्यांचा तिसरा मुलगा म्हणून संबोधले. इतकंच नाही तर यानंतरही अनेक प्रसंगी इंदिराजींनी कमलनाथ यांची तिसरा मुलगा म्हणून ओळख करून दिली. आणीबाणीच्या काळात संजय गांधी तुरुंगात गेले होते, तेव्हा कमलनाथही तुरुंगात गेले होते. ते काँग्रेसचे कट्टर निष्ठावंत बनले होते. 

ADVERTISEMENT

कमलनाथांचा भाजपला कसा फायदा होईल?

कमलनाथ यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, तर काँग्रेसला मोठा फटका बसेल, तर भाजपला मोठा फायदा होईल. कमलनाथ यांच्या आगमनाने काँग्रेसला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. कमलनाथ हे काँग्रेससाठी निधी उभारणीचे मोठे स्रोत मानले जातात. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आता माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही काँग्रेसला राम राम ठोकला तर मोठा झटका बसेल. 

काँग्रेसचे अनेक आमदारही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात

कमलनाथ यांनी काँग्रेस सोडल्यास त्यांच्यासोबत या पक्षाचे अनेक आमदार आणि नेतेही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. याचा थेट फायदा लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या भाजपला होणार आहे. या राज्यातील लोकसभेच्या सर्व जागांवर भाजप विजयाची नोंद करू शकते. कमलनाथ गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या समर्थकांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश काँग्रेसला निश्चितच मोठा धक्का असेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT