Amol Kolhe यांना म्हटलं.. अहो लोकं जोड्याने मारतील...: अजित पवार

मुंबई तक

Ajit Pawar Criticized Amol Kolhe: शिरुरमधील एका सभेत बोलताना अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंवर जोरदार टीका केली. दोनच वर्षात अमोल कोल्हे यांना खासदार पदाचा राजीनामा द्यायचा होता असा दावा अजित पवार यांनी केला.

ADVERTISEMENT

अजित पवारांची अमोल कोल्हेंवर जोरदार टीका
अजित पवारांची अमोल कोल्हेंवर जोरदार टीका
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टीका

point

शिरूरमध्ये अजित पवारांची सभा

point

शिरूर मतदारसंघ अजित पवारांना?

Ajit Pawar Shirur: शिरूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. जे नेते शरद पवारांसोबत गेले आहेत त्यांच्याविरोधात स्वत: अजित पवार हे मैदानात उतरले आहेत. त्यासाठी त्यांनी बारामती पाठोपाठ आता शिरूरला टार्गेट केलं आहे. शिरुरचे खासदार अमोल कोल्हेंविरोधात अजित पवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. (lok sabha election 2024 in shirur ncp chief ajit pawar claimed that amol kolhe wanted to resign from the post of mp within two years)

अमोल कोल्हेंना दोन वर्षातच राजीनामा द्यायचा होता. मी त्यांना तेव्हा समजवलं.. पण या सेलिब्रिटींना आम्हीच एखाद्याविरोधात काढतो.. पण या नट-नटींचा राजकारणाशी काय संबंध आहे? असं म्हणत अजित पवारांनी आज (3 मार्च) शिरूरमधील एका सभेतून अमोल कोल्हेंवर जोरदार हल्ला चढवला.

हे ही वाचा>> Upendra Rawat : भाजप खासदाराची निवडणुकीतून माघार, अश्लील व्हिडिओ ठरलं कारण

पाहा खासदार अमोल कोल्हेंबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले...

'मी आपल्याला स्पष्ट सांगतो की, या सगळ्या बाबतीत मागं मीच तुमच्याकडे डॉ. अमोल कोल्हेंना मतदान करा अशा प्रकारची विनंती करायला यायचो. मी त्यांना दुसऱ्या पक्षातून माझ्या घरी नेऊन पक्षात प्रवेश देऊन आणि तिकीटही देऊन मी आणि वळसे-पाटलांवर जुन्नरची जबाबदारी टाकलेली.. माझ्यावर भोसरी, शिरुर आणि हडपसर ही जबाबदारी घेतलेली.. ती जागा आपण निवडून आणली.' 

'मलाही वाटलं वक्तृत्व चांगलं आहे.. दिसायला राजबिंडा आहे.. चांगल्या पद्धतीने काम करतील. पण नंतर-नंतर दोन वर्षच झाले आणि ते म्हणायले लागले की, दादा मला राजीनामा द्यायचाय.. मी म्हटलं जनतेने पाच वर्ष निवडून दिलंय आणि दोनच वर्षात राजीनामा द्यायचाय? लोकं जोड्याने मारतील.. काय अडचण काय आहेत?'

'ते म्हणाले मला जमणार नाही सारखं मतदारसंघात यायला, मला माझी नाटकं, सीरियल असतात.. माझ्या व्यवसायावर परिणाम होतोय, म्हणून मला राजीनामा द्यायचाय खासदारकीचा.. मी म्हटलं तसं करू नका...'

'खरं तर राजकारण त्यांचा पिंडच नाही.. आम्ही राजकारणी काय करतो.. एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर सेलिब्रिटी काढायचे.. खोटं नाही बोलत.. तुम्ही देशात बघा.. काही ठिकाणी हेमामालिनी उभ्या राहतात, निवडून येतात. काही ठिकाणी सनी देओल, धर्मेंद उभा राहतो. गोविंदा उभा राहतो. नट-नटीचा काय यांचा राजकारणांशी संबंध आहे?' 

हे वाचलं का?

    follow whatsapp