Maharashtra opinion poll : भाजपचं स्वप्न भंगणार, ठाकरे-शिंदे किती जागा जिंकणार, झोप उडवणारा पोल?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

भाजपने ४५ जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे, पण ते पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे.
Lok Sabha Election 2024 Opinion Poll : महाराष्ट्रात कोणता पक्ष जिंकणार सर्वाधिक जागा, ओपिनियन पोलची आकडेवारी काय?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक ओपिनियन पोल

point

भाजप प्रणित महायुती किती जिंकू शकते जागा?

point

महाविकास आघाडीला किती जागा मिळू शकतात?

Maharashtra lok sabha 2024 opinion poll : लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील 48 जागांपैकी कोण किती जागा जिंकणार, याची उत्सुकता वाढली आहे. त्यातच समोर आलेल्या इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या ओपिनियन पोलने भाजपचे टेन्शन वाढवलं आहे. भाजपने महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे, पण पोलच्या अंदाजानुसार महायुतीला झटका बसताना दिसत आहे. भाजप सर्वाधिक जागा जिंकेल, मात्र महायुतीच्या जागा घटणार असा कौल या पोलमधून समोर आला आहे. (India TV-CNX Opinion Poll Prediction on Maharashtra lok Sabha 2024 seats)

India TV-CNX Opinion Poll चे महाराष्ट्रातील आकडे समोर आले आहेत. या ओपिनियन पोलनुसार भाजप महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकू शकते. मात्र, महायुतीत असलेल्या शिवसेना (6 जागा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (4 जागा) मिळून 10 जागा मिळेल, असा अंदाज पोलच्या निष्कर्षाआधारे मांडण्यात आला आहे.

हेही वाचा >> भाजप 32 जागा, पवारांना 3, तर शिंदेंना फक्त...; शाहांनी काय सांगितलं?

महाराष्ट्रात महायुतीची पिछेहाट होणार? 

भाजप प्रणित महायुतीने 48 पैकी 45 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे, पण त्यांचं हे स्वप्न भंग पावेल, असा अंदाज या ओपिनियन पोलची आकडेवारी सांगते. भाजप 25, शिवसेना 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 4 अशा एकूण 35 जागाचं महायुतीला जिंकता येईल, असा या पोलचा अंदाज आहे. 2019 मध्ये भाजप-शिवसेना युतीला 41 जागा मिळाल्या होत्या. त्याच्याशी तुलना केली असता महाराष्ट्रात युतीला 6 जागांचा फटका बसताना दिसत आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीला किती जागा?

India TV-CNX Opinion Poll महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवणारा आहे. 48 पैकी केवळ 13 जागाच महाविकास आघाडीला मिळतील, असे या पोलचे निष्कर्ष आहेत. यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्वाधिक जागा जिंकू शकते असा अंदाज आहे. ठाकरेंच्या शिवसेना 8 जागा जिंकू शकते, तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागा आणि काँग्रेसला 2 जागांवरच विजय मिळेल, असे अंदाज या ओपिनियन पोलचे आहेत. 

हेही वाचा >> भाजपने एक जागा बळकावली, शिंदेंनी गमावली... अमित शाहांची भर सभेत 'ती' घोषणा!

या पोलने महाविकास आघाडीबरोबरच महायुतीचीही झोप उडवली आहे. महाविकास आघाडीकडून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्व राजकीय तडजोडी आणि आघाड्या करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे महायुतीकडून 45 पेक्षा जास्त आणि कमीत 41 जागा जिंकण्याचे प्रयत्न आहेत. पण, या पोलनुसार महायुतीला 6 जागांनी फटका बसताना दिसत आहे. हे ओपिनियन पोल आहेत. त्यामुळे निकालानंतरच महायुती आणि महाविकास आघाडीची खरी ताकद दिसणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT