NCP: 'अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं अन्...', NCP नेत्याच्या विधानाने खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

 amol mitkari big statement ajit pawar should leave mahayiti ajit pawar ncp maharashtra politics
लोकसभेत त्यांना महाविकास आघाडीने छळलं,
social share
google news

Amol Mitkari Big Statement : ''अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं आणि वचिंतसोबत जावं'', असं विधान अजित पवाराच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केले आहे. अमोल मिटकरी यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान महायुतीत नेमकं असं झालं तरी काय आहे? ज्यामुळे अमोल मिटकरी यांनी हे विधान केलं आहे. हे जाणून घेऊयात. (amol mitkari big statement ajit pawar should leave mahayiti ajit pawar ncp maharashtra politics) 

ADVERTISEMENT

अमोल मिटकरी यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत बोलताना अमोल मिटकरी यांनी अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं आणि वंचितसोबत जावं, असे मोठं विधान केले आहे. ''काही लोकांचे असेच प्रयत्न आहेत. महायुतीत अजितदादांनी राहू नये. स्वत:चं त्यांना डॅमेज करणे, नंतर ते स्वत:हून ते निघून जावे,असा मानसिक त्रास दिला जातोय, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. पण असा जर डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सूरू असे तर तो राष्ट्रवादी काँग्रेसे पक्ष होऊ देणार नाही'',असे देखील अमोल मिटकरी यांनी सांगितले. 

हे ही वाचा : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या मेहुण्याचा आर्थर रोड कारागृहात मृत्यू! नेमकं घडलं काय?

''बाहेर पडलो तर पहिला प्रश्न हाच असेल, स्वबळावर लढायचं का? पण अनेक आमदारांचं म्हणणं आहे महायुतीत लढलं पाहिजे. कारण महायुतीत लढलो तर त्यांची मतदार संघात ताकद आहे. पण काही आमदाराचं म्हणणं आहे की स्वतंत्र लढू. पण जर जागावाटपात जर 50 ते 55 जागांवर बोळवण होत असेल तर मग वेगळा निर्णय पक्ष घेऊ शकतो'', असे अमोल मिटकरी यांनी म्हटलं. 

हे वाचलं का?

''वंचित आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते हा सर्वांर्थाना वरिष्ठांचा निर्णय आहे.पण प्रकाश आंबेडकर हे शिव शाहु फुले आंबेडकरांचे वारसदार आणि कार्य करणारे अजित पवार ही जोडी तर महाराष्ट्रात आली तर याच्यापेक्षा गोडसूख आमच्यासाठी नसेल. ही गोष्ट आता अजित दादा आणि प्रकाश आंबेडकांवर अवलंबून आहे'', असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. 

बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा स्वता;ची कारकिर्द सुरू केली. लोकसभेत त्यांना महाविकास आघाडीने छळलं, त्यांची स्वता: सांगितलं. संजय राऊत यांनी त्यांना कसं छळलं, नाना पटोले बोलले.  त्यापेक्षा आमच्या सारख्या फुले, शाहू, आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तीला व्यथा होणे सहाजिक आहे, असे अमोल मिटकरी म्हणाले आहेत. 

ADVERTISEMENT

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महायुतीसोबत खटके उडत आहेत. दोनच दिवसांपूर्वी शिंदेच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी अजित पवार महायुतीत थोडं उशिराने आले असतं तर चाललं असतं, असं विधान केलं होतं. या विधानावर अमोल मिटकरी यांनी "मागुन आलेले अजित दादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं" माहितीसाठी सांगतो ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका, असा पलटवार अमोल मिटकरी यांनी केला होता. 

ADVERTISEMENT

काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझेशन या मासिकातून थेट अजित पवारांना (Ajit Pawar) लक्ष्य करण्यात आलं होते.यावर देखील अमोल मिटकरी यांनी आक्रमक भुमिका मांडली होती.  ''भारतीय जनता पार्टीच्या एका बैठकीत अजित पवार यांच्यामुळे आपला पराभव झाला अशा पद्धतीची भावना काही आमदारांनी व्यक्त केली. माझं त्यांना सांगणं आहे की, जर जाणीवपूर्वक अजित पवारांना टार्गेट केलं जात असेल तर आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल,'' अशा शब्दात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता महायुतीत खटके उडायला सुरूवात झाल्याच चित्र आहे. 

हे ही वाचा : Govt Job: निवांत नोकरी, भरघोस पगार... माझगाव डॉकयार्डमध्ये 8वी-10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT