Arif Shaikh: अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या मेहुण्याचा आर्थर रोड कारागृहात मृत्यू! नेमकं घडलं काय?
Arif Shaikh : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा आरिफ शेख उर्फ आरिफ भाईजान याचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
ADVERTISEMENT
Chhota Shakeel Brother-in-law Arif Shaikh : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा आरिफ शेख उर्फ आरिफ भाईजान याचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. टेरर फंडिंग प्रकरणात अटक करण्यात आलेला आरिफ शेख हा छोटा शकीलचा मेहुणा होता. अटक झाल्यापासून तो आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत होता. तुरुंगात आरिफला अचानक छातीत दुखू लागले, त्यानंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल केले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'तुला राजकारणातूनच उठवतो..', जरांगेंची भुजबळांवर जहरी टीका
मात्र उपचारादरम्यान आरिफचा मृत्यू झाला. अंडरवर्ल्ड डॉन आणि गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याचा साथीदार छोटा शकीलला मदत केल्याचा मृत आरोपी आरिफ शेखवर आरोप होता. 61 वर्षीय आरिफ शेख याला एनआयएने मे 2022 मध्ये अटक केली होती. दाऊद इब्राहिम आणि शकीलसह डी गँगमधील अनेकांना मदत केल्याचा आरोप त्याच्यावर होता. अटकेनंतर तो गेल्या दोन वर्षांपासून आर्थर रोड कारागृहात कैद होता.
हेही वाचा : ओबीसींच्या बैठकीत काय घडलं... भुजबळ एवढे का संतापले?
मिळालेल्या माहितीनुसार, आरिफ शेखला शुक्रवारी (21 जून) श्वसनाचा त्रास होत असल्याने आणि छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरिफच्या नातेवाईकाने सांगितले की, "त्याला दोन मुली आहेत. तसंच त्याला आरोग्याची कोणतीही समस्या नव्हती, प्रकृती ठीक होती. अधिकारी आम्हाला काहीही सांगत नाहीत, आम्ही जेजे रूग्णालयातून माहिती गोळा केली."
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT