Manoj Jarange: 'शाळा करतो काय, तुला राजकारणातूनच उठवतो..', जरांगेंची भुजबळांवर जहरी टीका
Manoj Jarange vs Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाबाबत बोलताना मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात अत्यंत जहरी शब्दात टीका केली आहे. जाणून घ्या नेमकं काय म्हणाले जरांगे..
ADVERTISEMENT
Manoj Jarange Maratha Reservation: मुंबई: मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊ नये यासाठी राज्यातील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे सातत्याने मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. पण याच मुद्दावर बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर अत्यंत जहरी शब्दात टीका केली आहे. (i will end your political career manoj jarange slams chhagan bhujbal for opposing maratha reservation)
ADVERTISEMENT
एकीकडे वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लक्ष्मण हाके हे आंदोलन करत असताना दुसरीकडे मुंबईत ओबीसी नेत्यांची राज्य सरकारसोबत बैठक पार पडली. त्या दरम्यान, मनोज जरांगे यांनी रुग्णालयातून एक तातडीची पत्रकार परिषद बोलावली. ज्यामध्ये बोलताना त्यांनी छगन भुजबळांवर जोरदार टीका केली.
'तो.. तो चाबरा आहे.. त्याने बसवलंय हे सगळं.. त्याला दोन नवीन जोड भेटलेत.. शाळा करतो.. तुला जर राजकीय करिअरमधून नाही उठवलं ना.. तर नाव बदलून ठेवेल.. तू किती पळतो बघतो तुझ्याकडे..' अशा शब्दात जरांगेंनी भुजबळांना थेट आव्हानच दिलं आहे.
पाहा मनोज जरांगे फडणवीस आणि भुजबळांबद्दल काय-काय म्हणाले..
'फडणवीस साहेब तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवला, बघा.. मी मराठ्याला सांगितलंय.. शंभूराज देसाई मध्ये पडलेत मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेबांवर विश्वास पुन्हा ठेवायचा. तुम्ही अन्याय होऊ देणार की हे आमच्या लक्षात आलंय.'
हे वाचलं का?
हे ही वाचा>> OBC Reservation : पंकजा मुंडेंचं आतातरी मुख्यमंत्री शिंदे ऐकणार का?
'आमच्या पक्कं लक्षात आलंय.. तुम्ही हे ओबीसी नेत्याच्या दबावाला बळी पडून मराठ्यावर अन्याय करणार आहात. 100 टक्के तुम्ही मराठ्यावर अन्याय करणार आहात. कारण तुमच्या सगळ्या सगेसोयऱ्याच्या व्याख्या बदलत आहेत. तुम्ही हैदराबादचं गॅझेट असून लावत नाहीत. का बरं सांगत नाही.. फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्ही सुद्धा..'
'मराठ्यांच्या ज्या नोंदी सापडल्यात त्या आम्ही देणार हे का ठासून सांगत नाहीत तुम्ही? दुसऱ्या दिवशी जातीवाद बंद होईल. तुम्ही सांगा ठासून..;'
ADVERTISEMENT
'ज्या ओरिजनल नोंदी, ओरिजनल गॅझेट निघालेत ते आम्ही लावणार आहेत. तुम्ही आडवे पडू नका. फूस देता त्यांना.. आंदोलनं तुम्हीच उभे करता.. तुम्ही येड्यात काढता मराठ्याला.. माझ्या मराठ्याला डुबवायचं काम केलं ना.. तर तुम्हाला बुडवलंच मी.. लक्षात ठेवा..'
ADVERTISEMENT
'माझा पण मराठा एक झालाय.. पूर्वी एक नव्हता.. तेव्हा आम्हाला पण निर्णय घेता येत नव्हते. अडचण येत होता निर्णय घ्यायला. आता समाज एक आहे. त्यामुळे आम्हीच एकटे 50-55 टक्के आहोत.. बघतोच तुम्ही कुठपर्यंत पुरतात आमच्यासोबत..'
'वाद लावतात, यांच्याकडे आम्ही नाही लक्ष देत.. हे आंदोलन करणारे आमचे विरोधकच नाहीएत. एकाही धनगर बांधवाला आणि ओबीसीच्या खालच्या नेत्याला दुखावलेलं नाही..'
'तो.. तो चाबरा आहे.. त्याने बसवलंय हे सगळं.. त्याला दोन नवीन जोड भेटलेत.. शाळा करतो.. तुला जर राजकीय करिअरमधून नाही उठवलं ना.. तर नाव बदलून ठेवेल.. तू किती पळतो बघतो तुझ्याकडे..'
हे ही वाचा>> ओबीसींच्या बैठकीत काय घडलं... भुजबळ एवढे का संतापले?
'आमच्या भविष्याचं वाटोळं करायला जमतं का त्याला? गाड्या फोडतो, आमचं-आमच्यात लावून देतो. गावखेड्यात आम्ही एक आहोत. लढणाऱ्याला पण कळत नाही आपण कोणासाठी लढतोय. ते राजकारणी आहेत. ते राजकीय फायद्यासाठी करतंय.'
'पाठबळ देतात त्याला.. पडलेली गँग सगळी राज्यातील.. साथ देतात होय.. वा.. निवडणूक झाल्यावर बघू.. हे बघतायेत का? आम्ही पण आंदोलन झाल्यावर बघू.. आमचंही आंदोलन संपणार आहे. आम्हीही बघू..'
'आम्हाला वाटतंय जातीय तेढ नको म्हणून आम्ही शांत आहोत. पण तुम्ही असले खोटे बोलणार असाल.. आमच्या 7/12 वरचं नाव हटवून आमच्या जमीन तुम्हाला बळकवायच्या आहेत का? तुम्ही काय वेडे समजता का आम्हाला?'
'मराठ्यांनो सावध व्हा.. मराठ्यांच्या नेत्यांना पण सांगतो.. फक्त ऐकू नका.. तुमचा पण कार्यक्रम लागेल उलटासुलटा.. आम्ही जर बाजू सरकलो तर ते कार्यक्रम लावतील.. हे जर आरक्षण असून एवढं लढत असतील तर आपण नसणाऱ्यांनी किती लढलं पाहिजे.. ताकदीने एक राहा बघू कसं आरक्षण देत नाही सरकार ते..'
असं म्हणत मनोज जरांगे यांनी एक प्रकारे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवरच टीका केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT