OBC Reservation : पंकजा मुंडेंचं आतातरी मुख्यमंत्री शिंदे ऐकणार का?

भागवत हिरेकर

Pankaja Munde OBC Reservation : ओबीसी आरक्षणाच्या मुद्दा राज्यात तापला आहे. त्यात आता पंकजा मुंडे यांनी उडी घेतल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कात्रीत अडकल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

ADVERTISEMENT

पंकजा मुंडे आणि एकनाथ शिंदे
पंकजा मुंडे यांनी एकनाथ शिंदेंकडे केली मोठी मागणी.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पंकजा मुंडेंची एकनाथ शिंदेंकडे मागणी

point

ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाकेंचे उपोषण

point

पंकजा मुंडे याचे शिंदे, फडणवीस, पवारांना पत्र

OBC Reservation Latest Update : मराठा समाज हा मूळचा कुणबी आहे. त्यांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या. सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करा, या मनोज जरांगेंच्या मागण्यांना आता ओबीसी समाजातून तीव्र विरोध होताना दिसतोय. याविरोधात आता लक्ष्मण हाकेंसह ओबीसी कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. याकडे पंकजा मुंडे शिंदे सरकारचं सातत्याने लक्ष वेधून घेत आहे. मुंडेंनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रमुखांनी उपोषणकर्त्यांची भेट घेण्याची मागणी केलीये. त्यामुळे शिंदे आतातरी पंकजा मुंडेंचं ऐकणार का? प्रश्न चर्चिला जात आहे. (Pankaja Munde has demanded that Eknath Shinde should go and meet the OBC reservation hunger strike laxman hake in Wadigodri)

मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथे जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यांना आश्वासने देत त्यांचे उपोषण सोडले होते. मात्र, जेव्हा ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके आंदोलनाला बसले, तेव्हा मुख्यमंत्री शिंदेंनी ही तत्परता दाखवली नाही. यावरूनच पंकजा मुंडे शिंदे सरकार कोंडी पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 

आरक्षणासाठी उपोषण... पंकजा मुंडेंचा मुद्दा काय?

लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केले. त्यानंतर सरकारकडून त्याची दखल घेतली गेली नाही. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी 17 जून रोजी एक ट्विट केले. 

"प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पहावे."

हे वाचलं का?

    follow whatsapp