Chhagan Bhujbal: ओबीसींच्या बैठकीत काय घडलं... भुजबळ एवढे का संतापले?
what exactly happened in the obc meeting with chief minister eknath shinde why was chhagan bhujbal so angry
ADVERTISEMENT

Chhagan Bhujbal and OBC Reservation: मुंबई: ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी अत्यंत आक्रमक भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा तशाच स्वरुपाची भूमिका ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत घेतली. ज्यानंतर बैठकीत त्यांना ओबीसी आरक्षणाबाबत काही आश्वासनं देखील देण्यात आली. पण बैठकीनंतर पत्रकार परिषद घेताना छगन भुजबळ हे काहीसे संतापलेले दिसून आले. (what exactly happened in the obc meeting with chief minister eknath shinde why was chhagan bhujbal so angry)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्याप्रमाणे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले होते त्याच प्रमाणे ते वडीगोद्रीला जाऊन लक्ष्मण हाकेंची भेट घेणार का? असा सवाल जेव्हा भुजबळांना विचारण्यात आला तेव्हा ते काहीसे संतापलेले दिसून आले.
'आम्ही मंत्रिमंडळ जे.. जवळजवळ 7-8 मंत्री आहोत... ते जाणार आहोत. आम्ही जे आहे ते बोलू त्यावर त्यांचा विश्वास बसेल कारण मी तिथे आहे त्यामध्ये.. काळजी करू नका.. अहो छगन भुजबळ बोलतोय.. मी ओबीसीचा नेता आहे.. मी ज्या वेळेला निरोप घेऊन जातोय. त्या वेळेला माझे ते लोक आहेत.. ते विश्वास ठेवतील..' असं भुजबळ यावेळी म्हणाले..
'जातीचा दाखला आधारकार्डशी जोडणार...' ओबीसींच्या बैठकीनंतर भुजबळ नेमकं काय म्हणाले..
'वडीगोद्रीला लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे हे दोघे जण 9 दिवस उपोषण करत आहेत. त्यांच्याच बरोबर मंगेश ससाणे हे पुण्याला उपोषणाला बसले आहेत. त्यांनी ते उपोषण सोडावं म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी तीन-चार मंत्री महोदयांना त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि चर्चेला येण्याचं आमंत्रण दिलं होतं.'
हे ही वाचा>> OBC Reservation : पंकजा मुंडेंचं आतातरी मुख्यमंत्री शिंदे ऐकणार का?
'त्यानुसार आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मी स्वत: अतुल सावे, गिरीश महाजन, उदय सामंत, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर विशेषत: वडीगोद्री आणि पुण्याहून आलेले कार्यकर्ते हे सगळे तिथे हजर होतो.'










