Chhagan Bhujbal : ईडीपासून मुक्तिसाठी भाजपसोबत... भुजबळ काय म्हणाले? राजकीय वर्तुळात खळबळ का माजली?
ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा समोर आल्यानं आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

छगन भुजबळ यांच्याबद्दलच्या मुद्द्यावरुन चर्चा का सुरू झाली?

भुजबळांनी यांनी नेमका काय दावा केला?

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंच्या पुस्तकात काय म्हटलंय?
Chhagan Bhujbal : ईडीने दबाव टाकून मला पक्ष बदलण्यास भाग पाडलं.. मी ओबीसी असल्यामुळे मला लक्ष्य करण्यात आलं असा खळबळजनक दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या आगामी पुस्तकात हा विषय मांडण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा समोर आल्यानं आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
हे ही वाचा >>Sharad Pawar : भाजपसोबत गेलेल्या कुणासोबतच... शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका, मुख्यमंत्रीपदाबद्दल मोठं वक्तव्य
"अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपसोबत महायिती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण अर्थातच ईडीपासून सुटका... ती झाल्यानं सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला... माझ्यासाठी ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जमन्मच होता..." असं राजदीप सरदेसाई यांनी आपल्या आगामी पुस्तकात लिहिल्याचं समोर आलं आहे. एका वृत्तपत्रात ही बातमी छापून आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.