Praniti Shinde : ''देवेंद्र फडणवीसांचा दंगली घडवण्याचा कट होता'', काँग्रेस खासदाराचा खळबळजनक आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

 congress mp praniti shinde big allegation on devendra fadnavis and bjp solapur lok sabha 2024 ram satpute
भाजपवाले रक्ताचे राजकारण करतात.
social share
google news

Praniti Shinde On Devendra fadnavis : लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) शिंदे यांनी केला आहे. हे रक्ताने राजकारण करतात, भाजपवाल्यांना याची लाज वाटली पाहिजे, असा हल्ला देखील प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी यावेळी चढवला.  (congress mp praniti shinde big allegation on devendra fadnavis and bjp solapur lok sabha 2024 ram satpute) 

सोलापूर लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी कृतज्ञता मेळावा भरवला होता. या मेळाव्यातून बोलताना प्रणिती शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. 

हे ही वाचा : शरद पवारांनी अजित दादांच्या परतीचे दोर कापले, काय म्हणाले?

भाजपचे राज्यातील बडे लोक हे गावामध्ये जिल्ह्यामध्ये येऊन भांडण आणि दंगल लावण्याचा प्रयत्न करणार होते. ते कानात सांगितलं गेलं होतं. मतदानाच्या दिवशी पोलिंगवर काय झालं होतं. सीपींनी सांगितलं होतं. जा बाहेर नाहीतर उमेदवारावर एफआयआर करावा लागेल. त्यावेळेस भाजपवाल्यांना कळालं होतं निवडणूक आपल्या हातातून गेली आहे. आता एकच उपाय आहे. दंगल घडवून आणा. निवडणुकीत लोकांमध्ये विभागणी करा आणि निवडून या असं त्यांना सांगण्यात आलं होतं. त्यांची पाच दिवस अगोदरची भाषणे काढून बघा, असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपूतेंवर निषाणा साधला होता. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, सोलापुरात मतदानाचा दोन दिवस आधी दंगली लावणार होते. भाजपवाल्यांना लाज वाटायला पाहिजे.रक्ताने राजकारण करतात ही लोकं, लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिलावळ्यांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता,असा गंभीर आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे. 

हे ही वाचा : 'मंगळसूत्र, वोट जिहाद अन् नरेटिव्ह...', ठाकरेंनी चढवला PM मोदींवर हल्ला

रोज टीव्हीवर दिसण्याची सवय असल्याने असे स्फोटक वक्तव्य त्या करत असतात, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रणिती शिंदे यांना लगावला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दंगली थांबवण्याच काम केले. दंगली घडवण्याचं काम शरद पवार आणि काँग्रेसच्या काळात झाल्याचा पलटवार बावनकुळे यांनी केला. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT