Gadchiroli Vidhan Sabha Election : भाजपसाठी गडचिरोली विधानसभा जिंकणे अवघड? काँग्रेसची स्थिती काय?
Gadchiroli Vidhan Sabha Election 2024 : लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे गडचिरोली विधानसभा मतदारसंघात भाजपसाठी स्थिती कशी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गडचिरोली विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४
गडचिरोली विधानसभेत काय आहे राजकीय समीकरणे?
भाजप आणि काँग्रेससाठी गडचिरोली विधानसभेत काय आहे वातावरण?
Gadchiroli Assembly Constituency election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत प्रचंड मोठा झटका महायुतीला (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस) बसला. त्यामुळे विधान निवडणुकीच्या निकालाबद्दल उत्सुकता आहे. गडचिरोली लोकसभा मतदारसंघात काय घडू शकतं, याकडेही लक्ष आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत इथे भाजप वरचढ होती की काँग्रेस हे बघणं महत्त्वाचे ठरते. (In the Lok Sabha election 2024, Congress had get Lead from Gadchiroli Assembly Constituency)
गडचिरोली विधानसभा मतदारसंघ 2009 चा अपवाद वगळ्यास 1999 पासून भाजपकडे आहे. मागील दोन निवडणुकीत डॉ. देवराव होळी हे या मतदारसंघातून निवडून आले आहेत. यावेळी मात्र, भाजपसाठी गडचिरोली विधानसभेची निवडणूक जड जाऊ शकते. त्याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या मतदानातून समोर आलेली आकडेवारी. ही आकडेवारी भाजपची चिंता वाढवणारी आहे.
2014, 2019 अशा सलग दोन विधानसभा निवडणुकीत भाजपचे डॉ. होळी या मतदारसंघातून विजयी झाले. त्यापूर्वी 1999 आणि 2004 मध्ये भाजपचेच अशोक नेते या मतदारसंघाचे आमदार होते. पण, आता असं काय झालंय की, विधानसभेची निवडणूक कठीण जाऊ शकते, तेच जाणून घेऊयात...
लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये कुणाला किती मताधिक्य?
2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होती. गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून डॉ. महादेव किरसान हे काँग्रेसचे उमेदवार होते. तर भाजपचे अशोक नेते निवडणूक लढवत होते.










