Gautam Adani US Bribe Case : गौतम अदानी आणि पुतण्यातवर लाच दिल्याचे आरोप, अमेरिकेतलं प्रकरण काय?
अदानी ग्रुपची कंपनी 'अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड' आणि आणखी एका फर्मशी संबंधित आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
गौतम अदानी अडचणीत येणार?
अमेरिकेत झालेले आरोप नेमके काय?
गौतम अदानी यांनी चाल दिली?
Gautami Adani US Bridge Case : उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कंपनीच्या गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. अमेरिकेतील आपल्या कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी 265 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 2236 कोटी रुपये) लाच दिल्याचा आणि तो लपवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हे संपूर्ण प्रकरण अदानी ग्रुपची कंपनी 'अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड' आणि आणखी एका फर्मशी संबंधित आहे. त्यामुळे आता गौतम अदानी यांच्या अडचणींमघ्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
अदानींवर नेमके काय आरोप?
अमेरिकेतील 'सिक्युरिटी अँड एक्स्चेंज कमिशन'ने (SEC) काल 21 नोव्हेंबररोजी या प्रकरणी गौतम अदानी यांचा पुतण्या सागर अदानी, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे अधिकारी आणि ॲझ्युर पॉवर ग्लोबल लिमिटेडचे कार्यकारी अधिकारी सिरिल कॅबनेस यांच्यावरही आरोप केले आहेत. गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर यांनी इतर सात प्रतिवाद्यांसह त्यांच्या रिन्यूएबल एनर्जी कंपनीला कंत्राट मिळावेत आणि भारतातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा विकास करण्यासाठी सुमारे 2236 कोटी रुपये लाच देण्याची तयारी दाखवली होती.
हे वाचलं का?
हे ही वाचा >>Baramati Vidhan Sabha : भाषणाचे अर्थ, बुथवरचा राडा, मतदानाचा टक्का वाढला..'या' गणितामुळे अजितदादांना फायदा?
अब्जो रुपयांचं प्रकरण
अदानी यांच्याशी संबंधीत असलेलं हे संपूर्ण प्रकरण अब्जावधी डॉलर्सच्या नफ्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आहे. समोर आलेल्या अहवालानुसार, सरकारी वकिलांनी आरोप केला आहे की, या कराराद्वारे अदानी समूहाला २० वर्षांत 2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नफा अपेक्षित होता. 2020 ते 2024 दरम्यान अधिकाऱ्यांना लाच देण्यात आल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT