Vidhan Sabha : महायुतीची डोकेदुखी वाढणार? 'या' जागेवरुन अजितदादा-फडणवीसांच्या आमदारांमध्ये जुंपली

ADVERTISEMENT

harshavardhan patil vs dattatray bharne poster war indapur vidhan sabha 2024 mahayuti ajit pawar devendra fadnavis
पोस्टरमधून दोन्ही आमदारांनी उमेदवारीचा दावा केला आहे.
social share
google news

Harshavaradhan Patil vs Dattatray Bharne : वसंत मोरे, बारामती : लोकसभा निवडणुकीनंतर आता राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) तयारीला सुरूवात केली आहे. आमदारांनी देखील मतदारसंघात पोस्टरबाजी सुरू करून उमेदवारीसाठी मौर्चेबांधणी सुरु केली आहे. आता अशीच पोस्टरबाजी फडणवीसाच्या (Devendra Fadnavis) आमदाराने केली होती. या पोस्टरबाजीनंतर अजित पवारांच्या आमदाराने पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टरमधून दोन्ही आमदारांनी उमेदवारीचा दावा केला आहे. यामुळे आता इंदापूरच्या (Indapur Vidhan Sabha) जागेवरून विधानसभेत तिढा वाढणार आहे? आणि हा तिढा महायुतीची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे.  (harshavardhan patil vs dattatray bharne poster war indapur vidhan sabha 2024 mahayuti ajit pawar devendra fadnavis)   

ADVERTISEMENT

बारामती लोकसभा मतदार संघातील इंदापूर शहरात एक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या बॅनरवर विमानाचा फोटो आहे. तसेच इंदापुरात आमचा स्वाभिमान आमचे विमान अशा आशयाचे गुलाल उधळलेले बॅनर झळकवण्यात आले आहेत. आमचं आता ठरले. लागा तयारीला, विधानसभा 2024 असं या बॅनरमध्ये म्हटलं आहे. या चिन्हावरून हर्षवर्धन पाटील यांनी याआधी निवडणूक लढवली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील हे आता अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत का? अशी चर्चा आता रंगली आहे.

हे ही वाचा : माझी लाडकी बहीण योजना: तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर..

हर्षवर्धन पाटलांच्या या बॅनरची चर्चा असतानाच अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी करून त्यांना डिवचलं आहे. हर्षवर्धन पाटलांच्या बॅनरवर आमचं आता ठरलंय,असा मजकुर लिहण्यात आला होता. या ओळीचा आधार घेऊन बारणे यांच्या कार्यकर्त्यांनी आमचं ठरलं नाही तर आमचं फिक्स आहे, असा टोला लगावला. तसेच हॅट्ट्रीक पुर्ण करूया असा विश्वास देखील वक्त करण्यात आला होता. 

हे वाचलं का?

या पोस्टरबाजीमुळे विधानसभा निवडणुकीआधीच इंदापूरचे वातावरण तापले आहे. तसेच ही जागा विधानसभेत महायुतीची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या जागेचा तिढा सुटतो काय? आणि अजित पवारांच्या आमदाराला की फडणवीसाच्या आमदाराला संधी मिळते काय? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

हे ही वाचा : Crime: नगरसेवकाला बाथरुममध्ये बोलावलं अन् गुप्तांगच कापून टाकलं

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT