माझी लाडकी बहीण योजना: तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर..
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Details: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंबंधी काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच प्रश्नांची उत्तरं मुंबई Tak आपल्यासाठी घेऊन आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

माझी लाडकी बहीण योजनेची नेमकी माहिती

कोण पात्र, कोण अपात्र ठरणार?

महाराष्ट्रातील महिलांना मिळणार 1500 रुपये
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा राज्य सरकारने केल्यापासून याबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये सरकारच्या वतीने दिले जाणार आहेत. मात्र, असं असलं तरीही या योजनेचा नेमका कसा लाभ घ्यावा आणि त्यासाठी नेमकी पात्रता काय असणार याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम कायम आहे. त्यामुळे या योजनेसंबंधी आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नाच उत्तर आम्ही देणार आहोत. (mukhyamantri mazi ladki bahin yojana answer to every question in your mind)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे?
राज्यातील महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे, महाराष्ट्र सरकार राज्यातील सर्व गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत करणार आहे.
हे ही वाचा>> एका कुटुंबातील किती महिलांना मिळणार 1500 रुपये?, फडणवीसांची मोठी घोषणा
2. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी सुरू झाली?
2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' जाहीर केली.
3. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत किती रक्कम मिळणार?