MVA : मविआचा जागावाटपासाठी 'हा' फॉर्म्युला?; ठाकरे-पवारांच्या पक्षाला किती जागा?
MVA Vidhan Sabha Election 2024 : ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने आधी जागावाटपावर जोर दिला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

महाविकास आघाडीचा जागावाटपासाठी फॉर्म्युला काय?

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेे पक्षाला किती जागा मिळणार?
Maharashtra Assembly Election 2024, Maha Vikas Aghadi : लोकसभेची निवडणूक आटोपताच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीने आतापासूनच तयारी सुरू केली असून, जागावाटपावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. एका वृत्तानुसार महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे सूत्र ठरले असून, कुणीही मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ नसेल, समान जागा तिन्ही पक्षाना मिळतील, असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे.
द न्यू इंडियन एक्स्प्रेसमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दलचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या रिपोर्टनुसार महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला समसमान जागा येणार आहे.
महाविकास आघाडीचा जागावाटपासाठी कोणता फॉर्म्युला ठरला?
मविआतील विश्वसनीय सूत्रांचा हवाला देत हे वृत्त देण्यात आले असून, तिन्ही पक्ष विधानसभेच्या समान जागा लढतील. 96 चा फॉर्म्युला ठरला असून, त्यानुसार तिन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी 96 जागा मिळणार, असे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा >> "निकमांची 'सरकारी वकील' नियुक्ती रद्द करा", प्रकरण कोर्टात
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसकडून जास्त जागांची मागणी करण्यात आली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असे विधान काही दिवसांपूर्वी केले होते की काँग्रेसचे 13 खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसला जास्त जागा मिळाव्यात.