Election 2024: महायुती की महाविकास आघाडी.. कोणाला बसणार या 'महाशक्तीचा' सर्वात जास्त फटका?

मुंबई तक

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्या परिवर्तन महाशक्ती या आपल्या तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी 10 जागांची घोषणा केली आहे.

ADVERTISEMENT

'महाशक्तीची' पहिली यादी जाहीर
'महाशक्तीची' पहिली यादी जाहीर
google news

बातम्या हायलाइट

point

विधानसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टींच्या परिवर्तन महाशक्तीची पहिली यादी जाहीर

point

परिवर्तन महाशक्तीने 10 जागांची केली घोषणा

point

परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Assembly Election 2024 parivartan mahashakti 1st Candidates List: पुणे: विधानसभा निवडणूक 2024 साठी एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरू असताना दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे (प्रमुख, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष),  बच्चू कडू (अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष) आणि राजू शेट्टी (संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना) यांनी राज्यात तिसरी आघाडी स्थापन केली. ज्याला 'परिवर्तन महाशक्ती' (parivartan mahashakti) असं नाव देण्यात आलं आहे. याच 'परिवर्तन महाशक्ती'ची आज (21 ऑक्टोबर) एकत्रित पत्रकार परिषद घेण्यात आली. 

याच परिवर्तन महाशक्तीने विधानसभा निवडणुकीसाठी आता आपली पहिली यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये 10 जागांची घोषणा करण्यात आली आहे. त्यापैकी सर्वाधिक 4 जागा या बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला मिळाल्या आहेत.

हे ही वाचा>> Bjp Candidate 1st List : भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' 5 मतदारसंघ खेचले, 'त्या' जागांवर कोण लढणार?

पाहा परिवर्तन महाशक्तीची पहिली यादी 

1. ओमप्रकाश उर्फ बच्चू बा. कडू
मतदार संघ - अचलपूर
प्रहार जनशक्ती पक्ष

2. अनिल छबिलदास चौधरी
मतदार संघ - रावेर यावल
प्रहार जनशक्ती पक्ष

हे वाचलं का?