2024 Maharashtra Assembly Election Full Schedule: बिगुल वाजला! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, निकाल 'या' तारखेला

मुंबई तक

2024 Maharashtra Assembly Election Full Schedule: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या आहेत. जाणून घ्या तुमच्या मतदारसंघामध्ये नेमकं कधी मतदान होणार आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यक्रम करण्यात आला जाहीर

point

महाराष्ट्रात नेमक्या कोणत्या दिवशी होणार मतदान?

point

पाहा निकाल नेमका कधी होणार जाहीर

2024 Maharashtra Assembly Election Full Schedule Voting Dates, Constituency Wise Details and Results: नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल अखेर आज (15 ऑक्टोबर) वाजला. केंद्रीय निवडणूक आयोग राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठीचा कार्यक्रम जाहीर केला. जाणून महाराष्ट्रात नेमकं कधी मतदान पार पडणार आणि निकाल केव्हा लागणार. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा असून युती किंवा आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी 145 जागांची आवश्यकता असेल. याशिवाय या विधानसभेसोबत लोकसभेच्या 2 जागांवर पोटनिवडणूकही होणार आहे. केरळच्या वायनाड या लोकसभा मतदारसंघात 13 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबरला मतदान घेण्यात येईल. या दोन्ही पोटनिवडणुकांचे निकाल हे विधानसभेच्या निकालासोबतच म्हणजेच 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर केले जातील. (maharashtra assembly election 2024 full schedule voting dates results dates constituency key details all you need to know )

Maharashtra Assembly Election 2024 Schedule: निवडणुकीचं वेळापत्रक

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पाहा कोणत्या तारखेला हे मतदान पार पडेल

 -20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रात मतदान पार पडणार आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Election 2024: मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा! मुंबईत 'या' वाहनांसाठी आज रात्रीपासून टोलमाफीचा निर्णय

Maharashtra Assembly Election 2024 Voting Dates: पाहा काय आहेत मतदानाचा कार्यक्रम आणि तारखा

- एका टप्प्यात होणार महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक

हे वाचलं का?