Maharashtra Elections : मराठवाड्यात यंदाही जरांगे पॅटर्न चालणार? या '10' मुद्द्यांची चर्चा : राजदीपचा रिपोर्ट
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्यात कोणते मुद्दे परिणामकारक ठरू शकतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. याच निमित्तानं 'इंडिया टुडे'चे कन्सल्टिंग एडीटर राजदीप सरदेसाई हे सध्या मैदानात या निवडणुकीचा आढावा घेत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मराठवाड्यात कुणाची हवा?

विधानसभेच्या तोंडावर कोणत्या मुद्द्यांची चर्चा?

मनोज जरांगे यांच्यामागे अजूनही मराठा समाज कायम?
Vidhan Sabha Elections Marathwada : विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा मराठवाड्यातील मतदारांचा कौल महत्वाचा ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठवाड्यात फटका बसला होता. वर्षभरापूर्वी उभं राहिलेला मराठा आरक्षणाचा लढा, मनोज जरांगेंभोवती तयार झालेलं वलय यामुळे मतांचा फटका भाजपला बसल्याचं बोललं जात होतं. तर कित्येक वर्षांपासून ज्या हिंदू-मुस्लिम वादावर मराठवाड्यात निवडणुका व्हायच्या, तो मुद्दा लोकसभेला दिसला नव्हता. तसंच इतर काही मुद्देही महत्वाचे ठरले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्यात कोणते मुद्दे परिणामकारक ठरू शकतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. याच निमित्तानं 'इंडिया टुडे'चे कन्सल्टिंग एडीटर राजदीप सरदेसाई हे सध्या मैदानात या निवडणुकीचा आढावा घेत आहेत.
- मराठवाड्यात प्रमुख जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये गेली अनेक वर्ष हिंदू-मुस्लिम वाद हा निवडणुकांमध्ये महत्वाचा मुद्दा असायचा. सध्या मात्र ती दरी दिसली नाही. त्यामुळे याचा फटका धार्मिक ध्रुवीकरण करुन मतं मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पक्षांना बसू शकतो.
- मराठवाड्यात गेल्या काही काळापासून आरक्षणाच्या मुद्द्याने रान पेटवलंय. मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणाचं आदोलन, त्याच्या उत्तरात उभं राहिलेलं ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन, यामुळे जातीयवादाचा प्रश्न भीषण झालेला दिसतोय.