Maharashtra Politics : ना मविआ, ना महायुती... राज्यात कुणालाही बहुमत मिळणार नाही? काय आहे तज्ञांचा अंदाज?

मुंबई तक

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेनेचे दोन गट मैदानात आहेत. मात्र एकीकडे मविआ आणि दुसरीकडे महायुतीनेही सोबत घेतलेल्या पक्षांसोबत केलेली युती किंवा आघाडी ही अनैसर्गिक असल्याचं चित्र आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बंडखोरी आणि अंतर्गत कलहाचे वारे वाहताना दिसले. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काही जागांवरुन अजूनही तिढा कायम?

point

काय आहे मविआ आणि महायुतीचं भवितव्य?

point

राज्यात कुणाला मिळणार बहुमत?

Maharashtra Vidhan Sabha 2024 मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. त्यानंतर आता बहुतांश विधानसभेच्या मतादरसंघांचं गणित स्पष्ट झालंय. मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीत काही जागांवर पेच अजूनही कायम आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेनेचे दोन गट मैदानात आहेत. मात्र एकीकडे मविआ आणि दुसरीकडे महायुतीनेही सोबत घेतलेल्या पक्षांसोबत केलेली युती किंवा आघाडी ही अनैसर्गिक असल्याचं चित्र आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बंडखोरी आणि अंतर्गत कलहाचे वारे वाहताना दिसले. (Maharashtra Vidhan Sabha Opinion poll and political analysis on current scenario )


विधानसभेच्या 288 जागांपैकी महायुतीमधील पक्षांनी 284 जागा आपापसात वाटून घेतल्या असून, चार जागा छोट्या मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. महायुतीमध्ये भाजप 152 जागा लढवणार असून त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 80 जागांवर उमेदवार मैदानात उतरवलेत आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 52 जागा मिळाल्या आहेत.


दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने 101 जागा मिळवण्यात यश मिळवलं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (UBT) 96 जागांवर आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 87 जागांवर उमेदवार उतरवलेत. महाविकास आघाडीने समाजवादी पार्टी आणि CPI साठी प्रत्येकी दोन जागा सोडल्या आहेत. MVA मध्ये समान जागावाटप होईल असं चित्र सुरूवातीला होतं, मात्र काँग्रेस आणि शिवसेनेत काही जागांवर वाद झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आता हा प्रश्न जवळपास सुटलाय. 

मविआमध्ये समन्वयाचा अभाव?

 

हे ही वाचा >>Congress Song : यंदा पंजा, यंदा पंजा... काँग्रेसचं प्रचारगीत, नाना पटोले मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? का होतेय चर्चा?

 

महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जागावाटपावरुन ज्या प्रकारे रस्सीखेच झाली, ती सर्वश्रूत आहे. मात्र निवडणुका तोंडावर असल्यानं काही गोष्टींवर तडजोड करण्यात आल्याचं दिसतंय. मिरज , सोलापूर दक्षिण, पंढरपूर आणि सांगोला, परंडा, दिग्रस , धारावीमध्ये अजूनही तिढा कायम असल्याचं दिसतंय. या भागात चार जागांवर काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी, म्हणजेच एकाच मतदारसंघात दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. धारावी वगळता या सर्व जागा सध्या महायुतीच्या उमेदवारांकडे आहेत. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असं स्पष्ट केलंय. काही जागांवर आमच्या सहकाऱ्यांनी अर्ज भरले असतील, तर ते प्रश्न येत्या काही दिवसांत सोडवले जातील असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता या जागांवर होणाऱ्या वाटाघाटीवर मविआचं भवितव्य अवलंबून असल्याचं दिसतंय.

हे वाचलं का?

    follow whatsapp