Maharashtra Vidhan Sabha : राज्यात महायुती पुन्हा बाजी मारणार? मविआला किती जागा मिळणार? : IANS सर्व्हे
राज्यात सध्या सर्वच पक्षांचा प्रचाराचा जोर वाढला आहे. त्यातच आता हा सर्व्हे आल्यानं राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची चिन्ह आहेत.
ADVERTISEMENT
Maharashtra Vidhan Sabha Elections Survey : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सध्या सत्तेत असलेल्या महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीव्यतिरिक्त राज्यात यंदा वंचित, एमआयएम आणि परिवर्तन महाशक्ती आघाडी आणि छोटे पक्ष मैदानात आहेत. विधानसभा निवडणुकांच्या निकालाबद्दल वेगवेगळ्या अंदाज वर्तवले जात असतानाच आजा आयएएनएस या संस्थेनं नुकताच आपला सर्वे प्रसिद्ध केला आहे. ज्यामाध्यमातून राज्यात महायुतीचंच सरकार येणार असल्याचा अंदाज आहे. या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला फक्त 126 पर्यंत जागा जिंकता येतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Asaduddin Owaisi Exclusive : 'एक हैं तो सेफ हैं' या नाऱ्याला उत्तर, संभाजीनगरमध्ये ओवैसी म्हणाले "अनेक हैं तो...
राज्यात सध्या प्रचाराचा जोर चांगलाच वाढत चालला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून बड्या नेत्यांची फौज प्रचारासाठी उतरवलेली आहे. नुकत्याच समोर आलेल्या आयएएनएसच्या या सर्व्हेमधून राज्यात महायुतीला 145 ते 165 आणि महाविकास आघाडीला 106 ते 126 पर्यंत जागा मिळण्याची शक्यता आहे. मतांची टक्केवारी पाहिल्यास राज्यातील 47 टक्के लोकांचा कल महायुतीकडे असेल, तर 41 टक्के लोकांचा कल हा मविआकडे असल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे 5 जागांवर अपक्ष किंवा इतर लहान पक्षांचे उमेदवार गुलाल उधळतील अशी शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात मविआला कमी जागा मिळणार?
समोर आलेल्या सर्वेनुसार महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्रात महायुतीपेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 29 ते 32 जागा आणि महायुतीला 31 ते 38 जागा मिळण्याती शक्यता आहे. तर दोन जागा इतरांना मिळतील.
हे वाचलं का?
IANS सर्व्हेनुसार राज्यात कुणाला किती जागा मिळणार?
विभाग | एकूण जागा | महायुती | मविआ | इतर |
पश्चिम महाराष्ट्र | 70 | 31-38 | 29-32 | 02 |
विदर्भ | 62 | 32-37 | 21-26 | |
मराठवाडा | 46 | 18-24 | 20-24 | 02 |
ठाणे-कोकण | 39 | 23-25 | 10-11 | 01 |
मुंबई | 36 | 21-26 | 10-13 | |
उत्तर महाराष्ट्र | 35 | 14-16 | 16-19 | |
एकूण | 288 | 145-165 | 106-126 | 0-5 |
दरम्यान, 21 सप्टेंबर 2024 ते 06 ऑक्टोबर 2024 दरम्यान 'लोकनिती : सेंटर आणि स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज् आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट'ने ही एक सर्व्हे केला होता, ज्यामध्ये महायुती सरकारचं काम आणि यापूर्वी असलेल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारने केलेल्या कामाबद्दल लोकांची मतं जाणून घेण्यात आली होती. त्यानुसार बहुतेक मतदारांचं सरकारवर समाधान व्यक्त करण्याचं कारण हे राज्यातील शिंदे सरकार आणि केंद्रातलं मोदी सरकारमार्फत चालवल्या जाणाऱ्या योजनाच आहेत. त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये त्याचा कसा परिणाम होतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र, यामध्ये हे सुद्धा महत्वाचं आहे की, योजनेचे सगळेच लाभार्थी हे सरकारच्या बाजूने नाहीत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT