Maha Vikas Aghadi : काँग्रेस नेत्यांना राहुल गाधींचा 'मेसेज', महाराष्ट्राबद्दल 2 तास खलबतं

साहिल जोशी

ADVERTISEMENT

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना महत्त्वाचा मेसेज दिला.
राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र काँग्रेसची दिल्लीत बैठक झाली.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राहुल गांधींचा महाराष्ट्र काँग्रेसला मेसेज

point

महाविकास आघाडी एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न

point

विधानसभा निवडणुकीवर चर्चा

Congress Maha Vikas Aghadi : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी, रमेश चेन्निथला, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेत्यांची या बैठकीत उपस्थिती होती. बैठकीत महाराष्ट्राबद्दल तब्बल दोन तास चर्चा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना महाविकास आघाडीबद्दल आणि मित्रपक्षांबद्दल महत्त्वाचा मेसेज दिला. (Rahul Gandhi Said to Congress Leader from maharashtra that all should take care to not harm Maha Vikas Aghadi alliance)

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्र, हरयाणासह इतर काही राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत पक्षाला चांगली कामगिरी करण्याची संधी असल्याचे जोखत काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. 

महाविकास आघाडीमुळे काँग्रेसला फायदा?

राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगले यश मिळवले. काँग्रेसने तब्बल 13 जागा जिंकल्या. सांगलीतून अपक्ष निवडून आलेल्या विशाल पाटलांनीही पाठिंबा दिल्याने काँग्रेसचे संख्याबळ 14 वर पोहोचले आहे. काँग्रेसच्या यशात महाविकास आघाडीचा वाटा मोठा आहे. त्यामुळे काँग्रेसकडून मविआ एकसंध ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासंदर्भातच राहुल गांधींनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना मेसेज दिला.

हे वाचलं का?

हेही वाचा >> लोकसभेला पडले, चिखलीकरांसाठी विधानसभेची लढाईही कठीण?

राहुल गांधी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना काय म्हणाले?

दोन तास वेगवेगळ्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीबद्दल आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना महत्त्वाचा दिला.

हेही वाचा >> फडणवीसांची मोठी कारवाई, 'या' IPS अधिकाऱ्याला केलं निलंबित 

राहुल गांधी काँग्रेस नेत्यांना म्हणाले, "शिवसेना आणि काँग्रेस एकत्र राहायला हवी, पण आपण आपली भूमिका टिकवून ठेवली पााहिजे. त्याचबरोबर सर्वांनी महाविकास आघाडीवर कुठल्याही प्रकारे परिणाम होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अशी विधाने करणे टाळा, ज्यामुळे महाविकास आघाडीची हानी होईल", असा मेसेज राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT