Loha Kandhar vidhan sabha : लोकसभेला पडले, चिखलीकरांसाठी विधानसभेची लढाईही कठीण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ गणित.
लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास प्रताप पाटील चिखलीकर इच्छुक.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024

point

महायुती कुणाला देणार उमेदवारी?

point

वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव दिसणार का?

Loha Kandhar vidhan sabha election 2024 : नांदेड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागले आहेत. 'जनभावना लक्षात घेता मला विधानसभा निवडणुकीचे तिकीट देण्याबद्दल पक्ष नक्की विचार करेल', असे म्हणत प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. पण, त्यांच्यासाठी निवडणूक जिंकणे किती सोप्पे, किती कठीण आहे, जाणून घ्या... (Loha Kandhar vidhan sabha election 2024 explainer)

ADVERTISEMENT

राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून विधानसभेची गणितं मांडण्यास सुरूवात झाली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिलेले प्रताप पाटील चिखलीकर यांनी आता विधानसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर महायुतीचा उमेदवार 1 लाख मतांनी जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.

लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघ माहिती

शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदर शिंदे हे लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 1 लाख 16 हजार 68 मते मिळाली होती. 

हे वाचलं का?

या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे शिवकुमार नगराळे हे उमेदवार होते. त्यांना 37 हजार 306 मते मिळाली होती.

हेही वाचा >> मविआचा जागावाटपासाठी 'हा' फॉर्म्युला?; ठाकरे-पवारांच्या पक्षाला किती जागा? 

शिवसेनेचे मुक्तेश्वर धोंडगे यांना 30 हजार 965 मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप धोंडगे यांना 14 हजार मते मिळाली होती. 

ADVERTISEMENT

2014 मध्ये या मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकर हेच आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भाजपचे मुक्तेश्वर धोंडगे यांचा 45 हजार 486 मतांनी पराभव केला होता. चिखलीकर यांना 92 हजार 432 मते पडली होती, तर धोंडगे यांना 46 हजार 949 मते मिळाली होती. 

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीत महायुतीला किती मिळाली मते?

2014 आणि 2019 मध्ये महायुतीसाठी अनुकूल वातावरण होते. पण, 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या महायुतीबद्दल तशी स्थिती राहिलेली नाही. हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले. लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघ लातूर मतदारसंघात येतो.

हेही वाचा >> मविआला रोखण्यासाठी महायुतीची स्ट्रॅटजी! विधानसभेसाठी अशी मत'पेरणी'? 

लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात महायुतीला अपेक्षित मते मिळाली नाही. प्रताप पाटील चिखलीकर हे आमदार राहिलेल्या या मतदारसंघातून काँग्रेसचे शिवाजी काळगे यांना मताधिक्य मिळाले. डॉ. काळगे यांना 82 हजार 326 मते मिळाली, तर भाजपच्या सुधाकर श्रृंगारे यांना 79 हजार 531 मते मिळाली. 

महायुतीसाठी आव्हानात्मक निवडणूक

लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील निवडणूक महायुतीसाठी आव्हानात्मक असेल, अशीच स्थिती सध्या दिसत आहे. केंद्रात आणि राज्यात (मविआ सरकारचा अपवाद वगळता) महायुतीचे सरकार आहे. सरकारविरोधी नाराजी असल्याचे लोकसभेला दिसून आले. तोच ट्रेंड विधानसभेला राहिला, तर निवडणूक जड जाऊ शकते. 

काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाला ताकद देणाऱ्या या मतदारसंघातून महायुतीला मताधिक्य घेणे आव्हानात्मक असेल. दुसरं महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण सोबत आले असले, तरी त्यांना लोकसभेला प्रभाव दाखवता आला नाही. आताही ते होईल याची शक्यता कमी असल्याचे राजकीय विश्लेषक म्हणताहेत. कारण या भागात आता अमित देशमुख यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वंचित बहुजन आघाडी निकालात निर्णायक ठरली होती. मात्र लोकसभेप्रमाणेच विधानसभेत वंचितचा करिश्मा चालणार का? हाही प्रश्न महत्त्वाचा आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT