Anil Parab : '19 ते 23 व्या फेरीतच गडबड अन् 650 मतांचा फरक...', परबांच्या आरोपाने खळबळ

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ravindra waikar election result amol kirtikar anil parab big allegation on election commission aditya thackeray mumbai north west lok sabha result ruturning officer vandana suryvanshi
19 व्या फेरीनंतर आपण निकाल जाहीर करणेच बंद केलं होते.
social share
google news

Anil Parab On Ravindra Waikar Result : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील निकालाच्या मतमोजणीवरून मोठा वाद पेटला आहे. ठाकरे गटाने तर मतमोजणीच्या संपूर्ण प्रक्रियेवरच बोट ठेवलं आहे. असे असताना आज ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी आमच्या मतांमध्ये  650 पेक्षा अधिक मतांचा फरक असल्याचा दावा केला आहे आणि निकालाच्या 19 आणि 23 फेरीपर्यंत निकालच जाहीर केला नसल्याचा आरोप केला आहे.( ravindra waikar election result amol kirtikar anil parab big allegation on election commission aditya thackeray) 

ADVERTISEMENT

आदित्य ठाकरे, अमोल कीर्तिकर आणि अनिल परब यांची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. या मतमोजणी केंद्रावर निवडणुकीच्या प्रक्रियेला हरताळ फासला गेला आहे. 19 व्या फेरीनंतर निवडणुकीच्या प्रक्रिया डावलली गेली. निकाल जवळ येत असताना निकालाची पारदर्शकता गेल्याचा आरोप अनिल परब यांनी केला.

हे ही वाचा : कीर्तिकरांनी 'ती' 2 मिनिटे घालवली अन् मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचा निकाल बदलला?

अनिल परब यावेळी म्हणाले,  मतदानाच्या दिवशी 17 सी हा फॉर्म असतो. या फॉर्मवर लिहलेले असते, या मतपेटीत किती मतदान झालेले आहे. त्याच्यावरती सर्व मतदान प्रतिनिधींची सही घेतली जाते. आणि केंद्राध्यक्ष सही करून फॉर्म देतो. हा फॉर्म आम्ही ज्या दिवशी मतमोजणीच्या दिवशी जातो,त्यावेळेला टॅली करून बघतो. आमच्या फॉर्मप्रमाणचे ही पेटी आहे की नाही मग ती पेटी उघडली जाते. 

हे वाचलं का?

एक दुसरा प्रकार असतो. मतमोजून झाल्यानंतर फॉर्म 17 सी पार्ट 2 हा फॉर्म भरून द्यायचा असतो आणि त्याच्यावरीत अधिकाऱ्यांची सही करायती असते. माझ्या या पेटीमध्ये किती मतमोजणी गेली आणि त्याची टॅली ही आहे आणि ती दिली गेली. या लोकसभेत अर्ध्या लोकांना हे फॉर्म दिले आणि अर्ध्यांना दिलेच गेले नाही. आम्ही मागणी करून देखील मिळाले नाही. ज्यामुळे  आमच्या मतात आणि त्यांच्या मतात जवळपास 650 हून अधिक आल्याचा दावा अनिल परब यांनी केला. 

हे ही वाचा : Vidhan Sabha Election 2024 : मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? काँग्रेस 105 जागा, तर...

आम्ही वारंवार मागणी केली होती. आमची मतं ही आपल्यापेक्षा 650 हून अधिक जास्त आहे. आपण कुठलीही प्रक्रिया राबवली नाही. 19 व्या फेरीनंतर आपण निकाल जाहीर करणेच बंद केलं होते. त्यानंतर थेट 22 ते 23 फेरीनंतर सगळे निकाल वाचले गेले, असा आरोप अनिल परब यांनी केला. तसेच आम्ही फॉर्म 17 सी 2 मागितलेले आहे ते देखील नाकारल्याचा आरोप परब यांनी केला. 

ADVERTISEMENT

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वारंवार फोन येत होते. वारंवार त्या बाथरूमला जात होत्या. तेथून त्या फोनवर कुणाशी तरी बोलत होत्या. त्यामुळे त्या कोणाशी बोलत होत्या? या सगळ्या गोष्टीची उमेदवार म्हणून माहिती मिळणे आवश्यक आहे. आणि जर निवडणुकीच्या कामकाजात जर पारदर्शकता आहे तर ती सीसीटीव्ही फुटेज द्यायला काहीही हरकत नाही, असे अनिल परब यांनी सांगितले आहे. 

ADVERTISEMENT

निवडणूक आयोगाने याची सगळी सुमोटो चौकशी केली पाहिजे. तक्रार घेऊन कारवाई केली पाहिजे, अशी मागणी अनिल परब यांनी केली. तसेच आमच्याकडच्या मतांचा हिशोब तपासून घ्यावा आणि आम्हाला न्याय मिळावा आणि अमोल कीर्तिकरांना विजयी घोषित करावं अशा प्रकारची याचिका आम्ही कोर्टात दाखल करू, असे अनिल परब यांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT