Sada Sarvankar : 'राज'पुत्राला महायुतीची साथ नाहीच! सदा सरवणकर यांनी अखेरच्या दिवशी दाखल केला उमेदवारी अर्ज
अमित ठाकरे हे दादर-माहिम मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेय यांनी याच दादर-माहिम मतदारसंघातून सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अमित ठाकरेंना महायुतीची साथ नाहीच!

सदा सरवणकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

दादर-माहिम मतदारसंघात तिरंगी लढत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात आहेत. आदित्य ठाकरे यांच्यानंतर थेट निवडणुकीच्या मैदानात उतरणारे दुसरे ठाकरे असणार आहेत. त्यांच्या या निवडणुकीसाठी राज ठाकरे मोठी फिल्डिंग लावतील अशी एक सहज शक्यता व्यक्त केली जात होती. राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांच्याशी भेटीगाठी घेताना दिसले होते. त्यामुळेच ते आगामी निवडणुकीत महायुतीतील पक्षांची मदत घेतील किंवा त्यांच्याशी मैत्रीपूर्ण लढत लढतील असं चित्र होतं. मात्र थेट अमित ठाकरे यांच्याविरोधातच शिंदेंनी उमेदवार दिल्यानं या सर्व शक्यता मावळल्या आहेत. आज सदा सरवणकर यांनी शिवसेनेकडून आपला अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे महेश सावंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे.
हे ही वाचा >>Sharad Pawar Baramati : आयुष्यात कधी कोर्टाची पायरी... पवार पक्षफुटीवर बोलले, अजित पवारांवर पहिला वार
अमित ठाकरे हे दादर-माहिम मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेय यांनी याच दादर-माहिम मतदारसंघातून सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सरवणकर यांना शिंदे माघार घ्यायला लावणार का असा प्रश्न सर्वांसमोर होता. तसंच भाजपच्या नेत्यांनीही अमित ठाकरे यांना मदत करण्याची भावना व्यक्त केली होती. मात्र तशा कोणत्याही घडामोडी घडल्या नाहीत. अखेर आज अखेरच्या दिवशी सदा सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता अमित ठाकरे यांना महायुतीची साथ नाहीच असं चित्र सध्या निर्माण झालं आहे.
सदा सरवणकर हे गेल्या दोन विधानसभा निवडणुकांपासून शिवसेनेचे आमदार आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या समन्वयासाठीही त्यांनी अनेकदा भेटीगाठी घेतल्या आहेत. एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांसह गुवाहाटीला जाऊन परत आल्यानंतर राज ठाकरेंचा भेट घेणारा पहिला आमदार सदा सरवणकर होते. त्यामुळे राज ठाकरे आपला लेकासाठी त्यांना शब्द टाकतील का असंही बोललं जात होतं. मात्र यातली कुठलीही घडामोड घडली नाही.
हे ही वाचा >>NCP Candidate List : शेवटच्या क्षणाला मोहोळचा उमेदवार बदलला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अखेरची यादी
दरम्यान, राज्यात जवळपास बहुतांश जागांचा मुद्दा संपला असला तरी, अजूनही काही जागांवरुन रस्सीखेच सुरू आहे. 20 नोव्हेंबररोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी येत्या 4 नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे आता यादरम्यान निवडणुकीतून कोणी माघार घेणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.