Navneet Rana: नवनीत राणा, रवी राणांची कटकट वाढली?, BMC ने दारावर लावली नोटीस
हनुमान चालीसा पठणावरून शिवसेना विरुद्ध नवनीत राणा, रवी राणा अशी राजकीय संघर्षांची ठिणगी उडालेली असतानाच आता राणा दाम्पत्यांच्या कटकट वाढली आहे. राणा दाम्पत्याला बृहन्मुंबई महापालिकेनं अवैध बांधकाम प्रकरणी नोटीस बजावली आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी खासदार नवनीत राणा यांच्या मुंबईतील खार येथील घराच्या दारावर नोटीस लावली आहे. राणा दाम्पत्याने घरात अवैध बांधकाम केले असल्याचा उल्लेख […]
ADVERTISEMENT

हनुमान चालीसा पठणावरून शिवसेना विरुद्ध नवनीत राणा, रवी राणा अशी राजकीय संघर्षांची ठिणगी उडालेली असतानाच आता राणा दाम्पत्यांच्या कटकट वाढली आहे. राणा दाम्पत्याला बृहन्मुंबई महापालिकेनं अवैध बांधकाम प्रकरणी नोटीस बजावली आहे.
मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी खासदार नवनीत राणा यांच्या मुंबईतील खार येथील घराच्या दारावर नोटीस लावली आहे. राणा दाम्पत्याने घरात अवैध बांधकाम केले असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आलेला आहे.
मुंबई महापालिकेनं दिलेल्या नोटीसमधील माहितीप्रमाणे महापालिकेचे अधिकारी ४ एप्रिल रोजी राणांच्या घरी जाणार आहेत. अधिकारी घराची पाहणी करून फोटोही घेणार आहेत.
मुंबई महापालिका कायदा १८८८ मधील कलम ४८८ नुसार राणा दाम्पत्याला ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. राणा दाम्पत्यांच्या घरात अवैध बांधकाम करण्यात आल्याचं म्हटलेलं असून, याची चौकशी करण्यासाठी अधिकारी घरी जाऊन पाहणी करणार आहेत.