पुणे जिल्ह्यात २२२ मशिदी आणि ९६ मंदिरांना पोलिसांनी दिली भोंगे लावण्याची संमती
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या अल्टीमेटम नंतर आज राज्यभर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या वतीने २२२ मशिदी तर ९६ मंदिरांवर स्पीकर लावण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील २२६ मशिदींनी आणि ९९ मंदिरांनी लाऊडस्पीकर लावण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. त्यापैकी २२२ मशिदी आणि ९६ […]
ADVERTISEMENT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या अल्टीमेटम नंतर आज राज्यभर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या वतीने २२२ मशिदी तर ९६ मंदिरांवर स्पीकर लावण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील २२६ मशिदींनी आणि ९९ मंदिरांनी लाऊडस्पीकर लावण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. त्यापैकी २२२ मशिदी आणि ९६ मंदिरांना पोलिसांनी परवानगी देण्यात आली आहे. राज्यात भोंग्यावरून राजकारण तापले आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. जर हे भोंगे हटविले नाहीत, तर मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचा इशारा त्यांनी दिला.
या इशाऱ्यामुळे पुणे जिल्ह्यातील मशिदींच्या व्यवस्थापनाने मोठ्या संख्येने भोंग्यासाठी परवानगी मिळावी यासाठी पोलिसांकडे अर्ज केले होते. त्याचबरोबर मंदिरांच्या व्यवस्थापनानेही स्पीकर परवाना मिळण्यासाठी पोलिसांकडे अर्ज केले होते.
आता २२२ मशिदी आणि ९६ मंदिरे यांना ही परवानगी दिली आहे. पण अर्थातच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण कायद्याची मर्यादा घालून दिली आहे, त्या मर्यादेचे त्यांना पालन करावे लागणार आहे. या अटीवरच ही परवानगी देण्यात आली आहे. आपल्या धर्मातील प्रार्थनास्थळा समोर लाऊड स्पीकर लावताना कोणतीही जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी असं पोलिसांनी सांगितलं आहे.
एवढंच नाही तर कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य करू नये. नागरिकांनी सामाजिक आणि धार्मिक सद्भावना जपावी, असे आवाहन पुणे ग्रामीणचे अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.
लाऊड स्पीकरचा मुद्दा साधारण महिनाभरापासून चर्चेत आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेत या प्रश्नाला पुन्हा एकदा वाचा फोडली. त्यानंतर १२ एप्रिलच्या उत्तरसभेत त्यांनी महाराष्ट्र सरकारला भोंग्यांबाबत अल्टिमेटमही दिला. आता आज या सगळ्या आंदोलनाचे आणि राज ठाकरेंनी केलेल्या आवाहनाचे पडसाद उमटताना दिसत आहेत.
मुख्यमंत्र्यांना राज ठाकरेंनी बुधवारच्या पत्रातही करून दिली होती बाळासाहेब ठाकरेंची आठवण
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की कै. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवारांचं ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊनच जाऊ दे.
देशात इतकी कारागृहं नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबणे सरकारला शक्य होईल हेसुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावं. माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारून एकत्र या. असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सवाल विचारला आहे आणि बाळासाहेबांचं ऐकणार आहात की नाही याचा फैसला लावा असंही म्हटलं आहे.