Loudspeaker Row : वसंत मोरेंनी राज ठाकरेंचा भोंग्यांबद्दलचा आदेश पाळला, पण...

Raj Thackeray Hanuman chalisa Row : एकीकडे राज्यात मनसेचं भोंग्याविरुद्ध आंदोलन सुरू असतानाच वसंत मोरे बालाजीच्या दर्शनासाठी तिरूपतीला गेलेले आहेत...
Loudspeaker Row : वसंत मोरेंनी राज ठाकरेंचा भोंग्यांबद्दलचा आदेश पाळला, पण...

मनसेचे मशिदींवरील भोंग्यांविरुद्धचं आंदोलन तीव्र झालेलं असताना चर्चा होतेय ती पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांची. मनसेकडून ४ मे रोजी भोंग्यावरून अजान देणाऱ्या मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजण्याचा इशारा देण्यात आलेला होता. मात्र, त्यापूर्वीच वसंत मोरे बालाजीच्या दर्शनाला निघून गेले. आता त्यांनी सोशल मीडियातून त्यांची भूमिका मांडली आहे. पण यात त्यांनी एक सलही बोलून दाखवली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला झालेल्या मनसेच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मनसेचे तत्कालिन शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी नाराजीचा सूर लावला होता. तेव्हापासून वसंत मोरे चर्चेत आहे.

Loudspeaker Row : वसंत मोरेंनी राज ठाकरेंचा भोंग्यांबद्दलचा आदेश पाळला, पण...
सांगा वसंत कुणी हा पाहिला? पुणे मनसे कार्यालयावरच्या शुकशुकाटानंतर एकच चर्चा

राज ठाकरे यांनी वसंत मोरेंना घरी बोलवून चर्चाही केली होती. त्याचबरोबर त्यांना ठाण्याच्या सभेलाही बोलावलं होतं. मात्र, ठाण्याच्या सभेत बोलतानाही वसंत मोरेंची भूमिका कायम असल्याचं दिसलं. त्यानंतर औरंगाबादच्या सभेनंतर राज ठाकरेंनी ४ मेपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला होता.

दरम्यान, ४ मे पूर्वीच वसंत मोरे बालाजीच्या दर्शनासाठी तिरुपतीला रवाना झाले. त्यामुळे वसंत मोरे पक्षाच्या भूमिकेशी सहमत नसल्याचीच चर्चा होत होती. ४ मे रोजी राज्यभरात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून भोंग्याविरुद्ध हनुमान चालीसा वाजण्याचा प्रयत्न झाला. अनेक ठिकाणी धरपकड झाली, पण पुण्यात चर्चा होती ती वसंत मोरेंच्या अनुपस्थितीची.

Loudspeaker Row : वसंत मोरेंनी राज ठाकरेंचा भोंग्यांबद्दलचा आदेश पाळला, पण...
'उद्याच्या सभेला ये, तुला उत्तर मिळतील'; राज ठाकरे-वसंत मोरेंच्या बैठकीत काय झालं?

या सगळ्या चर्चांनंतर वसंत मोरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वसंत मोरेंनी तिरुपतीवरूनच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या प्रभागातील मशिदींवरील भोंग्यांबद्दलही भाष्य केलं आहे.

"पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. पण मी सध्या पुणे शहराचे नाहीतर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय, साहेबांच्या आदेशानंतर मी माझ्या भागातील मशीद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली. आजची नमाज भोंग्याविना केली आणि भविष्यात ही सहकार्य करू, असं सांगितलं म्हणून माझ्या प्रभागातील सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक आभार," असं मोरेंनी म्हटलं आहे.

शहराध्यक्षपदावरून दूर केल्याची सल?

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा मांडल्यानंतर वसंत मोरे हे नाराज असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांची तडकाफडकी मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आली होती. वसंत मोरे यांच्याकडून जबाबदारी काढून घेत साईनाथ बाबर यांच्याकडे शहराध्यक्षपदाची सूत्रं सोपवण्यात आली होती.

वसंत मोरे यांनी केलेल्या या पोस्टमध्ये अप्रत्यक्षपणे ती सलही बोलून दाखवली आहे. वसंत मोरेंनी राज ठाकरेंचा आदेश पाळल्याचं म्हणण्यापूर्वीच एका गोष्टीचा प्रकर्षानं उल्लेख केला आहे. तो म्हणजे 'मी सध्या पुणे शहराचे नाहीतर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय.' त्यामुळे वसंत मोरेंना ही गोष्ट जिव्हारी लागली असल्याचं दिसत आहे.

Related Stories

No stories found.