पुण्यातल्या भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंच्या जावयांना कोर्टाचा मोठा दिलासा
पुण्यातल्या भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना मोठा दिलासा कोर्टाने दिला आहे. भोसरी येथील घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गिरीश चौधरींना त्यांच्या कुटुबीयांना रूग्णालयात भेटता येईल असं कोर्टाने म्हटलं आहे. पुण्यातल्या भोसरी जमीन घोटाळा प्रकरणातील आरोपी गिरीश चौधरी हे प्रोटीन लिक आणि इतर काही आजारांनी त्रस्त आहेत. त्यांना जे. जे. […]
ADVERTISEMENT

पुण्यातल्या भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना मोठा दिलासा कोर्टाने दिला आहे. भोसरी येथील घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गिरीश चौधरींना त्यांच्या कुटुबीयांना रूग्णालयात भेटता येईल असं कोर्टाने म्हटलं आहे.
पुण्यातल्या भोसरी जमीन घोटाळा प्रकरणातील आरोपी गिरीश चौधरी हे प्रोटीन लिक आणि इतर काही आजारांनी त्रस्त आहेत. त्यांना जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गिरीश चौधरी यांचे वकील अॅड. मोहन टेकवडे यांनी गिरीश चौधरींना त्यांच्या कुटुंबीयांना भेटता येण्याची मुभा द्यावी यासाठी मुंबईच्या सत्र न्यायलयात अर्ज केला होता. गिरीश चौधरी यांना रूग्णालयात नातेवाईकांना भेटू द्यावं अशी संमती मागितली होती. ही परवानगी आता कोर्टाने दिली आहे.
ED ने अटक केलेले गिरीश चौधरी कोण आहेत? काय आहे भोसरी चा भूखंड घोटाळा, जाणून घ्या…
गिरीश चौधरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. त्यांना भूखंड घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्यांना अटक करण्यात आली आहे.