अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक, घटना सीसीटीव्हीत कैद
Actor Sushant Shelar's car stone pelted, CCTV video footage of incident came to foreअभिनेता सुशांत शेलार, फोटो सौजन्य, फेसबुक पेज सुशांत शेलार

अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक, घटना सीसीटीव्हीत कैद

हा हल्ला कुणी केला आणि का केला याबाबत काहीही माहित नसल्याचं सुशांत शेलारने म्हटलं आहे

अभिनेता सुशांत शेलारच्या (Sushant Shelar) गाडीवर दगडफेक करण्यात आली असून गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. (Car Damge) यामध्ये सुशांत शेलारच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. गाडीची तोडफोड कुणी केली आणि त्यामागे काय कारण आहे? याबाबत काहीही माहित नसल्याचं सुशांतने म्हटलं आहे. ही घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे.

मराठी सिनेसृष्टीत आणि सीरियल विश्वातला अभिनेता सुशांत शेलार याच्या कारवर दगडफेक करण्यात आली आहे. या कारची तोडफोडही करण्यात आली आहे. यामध्ये सुशांत शेलारच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी सुशांत शेलारने ना. म. जोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.

फोटो सौजन्य-सुशांत शेलार

या घटनेनंतर काय म्हणाला सुशांत शेलार?

"हे कुणी केलंय मला माहित नाही. पण १५ तारखेच्या पहाटे २ ते २.१५ च्या दरम्यान ही घटना घडली आहे. हा भ्याड हल्ला आहे. हा हल्ला कुणी केला आणि का केला? हे मला माहित नाही. मी पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहे. "

सीसीटीव्हीत काय आहे?

अभिनेता सुशांत शेलारच्या कारवर दगडफेक करण्यात आल्याचा हा व्हीडिओ आहे. या व्हीडिओत काही अज्ञात लोक या कारवर दगडफेक करत असल्याचं दिसतं आहे. दगडफेक करण्यात आली तेव्हा ही कार पार्किंगमध्ये उभी होती असंही दिसतं आहे. आता प्रकरणी पोलीस तपासात काय समोर येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सुशांत शेलार हा मराठी सिनेसृष्टी आणि मालिका विश्वातला एक गुणी अभिनेता आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक सिनेमा, सीरियल्स आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. २०१८ मध्ये त्याने शिवसेनेत प्रवेश केला. त्याच्या कारची रात्री उशिरा तोडफोड करण्यात आली आहे. या कारचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. त्यावरून आता पुढील तपास करण्यात येतो आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in