Mhada Lottery documents : म्हाडाचा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे 'ही' कागदपत्रे हवीच!

मुंबई तक

Mhada Lottery 2024 Mumbai Required Documents : मुंबईतील तब्बल २०३० घरांसाठी म्हाडाकडून लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. अर्ज भरताना काही कागदपत्रे आवश्यक आहेत.

ADVERTISEMENT

म्हाडा लॉटरी २०२४ साठी अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
मुंबई म्हाडा लॉटरी २०२४ साठी कोणती कागदपत्रे असायला हवीत?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

म्हाडा लॉटरी २०२४ मुंबई

point

म्हाडा लॉटरी अर्ज करण्यासाठी कागदपत्रे

point

विवाहित अर्जदाराकडे कोणती कागदपत्रे हवीत?

Mhada Lottery 2024 documents : म्हाडाच्या लॉटरीची प्रतिक्षा अखेर संपली. 2030 प्लॅटसाठी म्हाडाची लॉटरी काढण्यात आली असून, 9 ऑगस्टपासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. नावनोंदणी करण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. आवश्यक कागदपत्रे नसतील, तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्रे हवीत, हे समजून घ्या... (Documents Required for Mhada Lottery 2024 Mumbai)

म्हाडाने मुंबईतील घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरताना काही महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला लागतील.

हेही वाचा >> 1500 रुपयांसाठी तुमच्या अर्जासमोर नेमकं काय असायला हवं? 

म्हाडा लॉटरीसाठी ही कागदपत्रे हवी

- मोबाईल क्रमांक (आधार कार्ड सलग्नित)
- ईमेल 
- आधार कार्ड नंबर
- पॅन कार्ड नंबर
- पत्नीचे आधार कार्ड (विवाहित असल्यास)
- पत्नीचे पॅन कार्ड (विवाहित असल्यास)
- रहिवासी प्रमाणपत्र
- आयटीआर (स्वतःचे)
- आयटीआर (पत्नीचे)
- उत्पन्नाचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- विशेष आरक्षित प्रवर्ग

म्हाडा अर्ज भरताना ही काळजी घ्या

आधार कार्डचा फोटो स्पष्ट असावा. अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आणि आधार कार्डवरील जन्मतारीख अचूक आणि स्पष्ट असावी. त्याचबरोबर पुढील व मागील फोटो असावा.

हे वाचलं का?

    follow whatsapp