Worli Accident : साडी अडकली तरी थांबला नाही; शिवसेना नेत्याचा मुलगा नंतर...
Worli Hit And Run Accident : मुंबईतील वरळी भागात पहाटे एका बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली. यात कावेरी नाकवा महिलेचा मृत्यू झाला. या अपघाताबद्दल आणखी माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वरळी परिसरात शिवसेना नेत्याच्या गाडीने महिलेला उडवले

कोळीवाडा परिसरातील कावेरी नाकवा महिलेचा मृत्यू

शिवसेना नेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह फरार
Worli Accident Mihir Rajesh Shah : मुंबईतील वरळी भागात असलेल्या अटरिया मॉलजवळ पहाटे भीषण अपघात झाला. यात महिलेचा मृत्यू झाला. या हिट अॅण्ड रन प्रकरणाने मुंबईत खळबळ उडाली आहे. ज्या कारने महिलेला उडवले, त्या कारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याचा मुलगा आणि चालक होता. धडक दिल्यानंतर महिलेची साडी कारमध्ये अडकली, मात्र कार थांबवली नाही. महिलेला तसेच फरफटत नेले. यात महिलेचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. (Shiv Sena Leader Rajesh Shah Son Mihir Shah has Absconded after accident)
दुचाकीवरून घरी जात असलेल्या एका दाम्पत्याला एका बीएमडब्ल्यू कारने जोराची धडक दिली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला.
वरळी अपघात : पहाटे साडेपाच वाजता काय घडलं?
मुंबईतील वरळीत अटरिया मॉल आहे. याच मॉलजवळ हा भीषण अपघात झाला. वरळी कोळीवाडा परिसरातील रहिवाशी कावेरी नाकवा या पतीसह दुचाकीवरून मासे लिलावासाठी ससून डॉकला गेल्या होत्या.
मासे घेतल्यानंतर दोघे दुचाकीवरून परत येत होते. मॉलजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू कारने धडक दिली. खूप सामान आणि मासे असल्याने दुचाकीचा तोल गेला आणि दोघेही बीएमडब्ल्यू कारच्या बोनेटवर पडले.