Worli Accident : 'गरीब रोज असेच रस्त्यावर मरतील', कावेरी नाखवांच्या पतीचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश

मुंबई तक

ADVERTISEMENT

वरळी अपघातात मृत्यू झालेल्या कावेरी नाखवा यांच्या पतीने सरकारला धारेवर धरले.
कावेरी नाखवा यांचे प्रदीप नाखवा यांना घटनाक्रम सांगताना अश्रू अनावर झाले.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वरळी अपघातात मृत्यू झालेल्या कावेरी नाखवा यांच्या पतीचा संताप

point

मिहीर शाहच्या वडिलांना जामीन मिळाल्यानंतर आक्रोश

point

शोक संतप्त प्रदीप नाखवा यांचा सरकारला तिखट सवाल

Worli hit and run case in marathi : (दीपेश त्रिपाठी, मुंबई) "हे म्हणताहेत गरिबांचं सरकार आहे, कोणत्या गरिबांचं सरकार आहे? गरीब असाच रस्त्यावर मरेल. गरीब दररोज असेच मरतील. त्याला बघणारं कुणीच नाहीये. आता आम्ही काय करायचं?" हा आक्रोश आहे कावेरी नाखवा यांचे पती प्रदीप नाखवा यांचा! कावेरी नाखवा यांचा 7 जुलै रोजी पहाटे ५.३० वाजता झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ज्या बीएमडब्ल्यू कारने त्यांना चिरडले, त्यात शिवसेना नेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह होता. (Pradip Nakhawa husband of deceased Kaveri Nakhawa said that, 'The poor will die on the streets like this every day')

मुंबईतील वरळी अॅटरिया मॉलजवळ 7 जुलै रोजी पहाटे ५.३० वाजता भीषण अपघात झाला. कावेरी नाखवा या त्यांचे पती प्रदीप नाखवा यांच्यासोबत दुचाकीवरून घरी जात होत्या. त्याचवेळी मिहीर शाह असलेल्या बीएमडब्ल्यू कारने धडक दिली होती.

हेही वाचा >> फरार मिहीर शाहला अखेर बेड्या, पोलिसांनी केली अटक 

कावेरी नाखवा या चाकाखाली अडकल्या होत्या. त्यावेळी बीएमडब्ल्यू कार न थांबता सी लिंकपर्यंत महिलेला फरफटत नेण्यात आले. त्यानंतर मिहीर शाह हा फरार होता. त्याला ९ जुलै रोजी अटक करण्यात आली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रदीप नाखवा यांना दुःख अनावर, सरकारवर संतापले

पत्नीच्या मृत्यूच्या आघाताने खचून गेलेले प्रदीप नाखवा रडत रडतच म्हणाले, "तो तिला सी लिंकपर्यंत फरफट घेऊन गेला. तो माणूस आहे की, जनावर? कुणी जनावरासोबतही असं करत नाही. तो फरफटत घेऊन गेला."

"तिला गाडीखाली फरफटत घेऊन जात होता, तेव्हा ती ओरडत होती. माझ्यासमोर घडलं. काय करू मी? हे प्रशासन फक्त बोलण्यासाठी आहे. प्रशासन काहीही करणार नाही. ते फक्त बोलतात की, आम्ही हे करतोय, ते करतोय", असा संताप प्रदीप नाखवा यांनी व्यक्त केला. 

ADVERTISEMENT

गरीब असेच मरत राहतील -प्रदीप नाखवा

"हे बोलतात गरिबांचं सरकार आहे. कसले गरिबांचे सरकार आहे? गरीब असे रस्त्यावर मरतील. दररोज मरतील. त्यांना बघणारं कुणी नाहीये. आता असेच मरायचे का? गरिबांना कुणी वाली नाहीये का? आमच्या मागे कोण आहे?", असा सवाल प्रदीप नाखवा यांनी सरकारला केला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "माझी बायको चाकाखाली, तो...", पती ढसाढसा रडला, सांगितलं काय घडलं? 

"आरोपीच्या वडिलाला जामीन मिळाला. उद्या ड्रायव्हरला जामीन मिळेल, नंतर त्या मुलालाही जामीन मिळेल. मग आम्हाला न्याय कोण देईल? हे न्यायालय आहे की काय आहे? डोळ्यावर पट्टी बांधून चालतं का?", असा संतापही नाखवा यांनी कोर्टाबद्दल व्यक्त केला.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT