शरद पवार-उद्धव ठाकरेंची भेट; संजय राऊतांनी सांगितलं बैठकीत काय घडलं?

ADVERTISEMENT

Nationalist Congress Party (NCP) chief Sharad Pawar and Shiv Sena (UBT) leader Uddhav Thackeray met on Tuesday night at Silver Oak
Nationalist Congress Party (NCP) chief Sharad Pawar and Shiv Sena (UBT) leader Uddhav Thackeray met on Tuesday night at Silver Oak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी बैठक झाली. मुंबईतील शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या बैठकीला खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे हे दोन्ही नेतेही उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल संजय राऊत यांनी आज माहिती दिली.

संजय राऊत म्हणाले, “शरद पवारांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ आणि महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक राजकीय घडामोडींवर आणि भविष्याची दिशा ठरवण्यावर चर्चा झाली. चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. अनेक विषय चर्चेमध्ये होते.”

“शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. मी होतो, सुप्रिया सुळे होत्या. उद्धवजी आणि शरद पवारांमध्ये सकारात्मक चर्चा झाली”, असं राऊत यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे काँग्रेससोबत करणार चर्चा; संजय राऊतांची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरे आता काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. याबद्दल संजय राऊत यांनी माहिती दिली. “काँग्रेसचे के.सी. वेणूगोपाळ येत आहेत. त्यांनी उद्धवजींची वेळ मागितली आहे. पुढील दोन दिवसांत मल्लिकार्जून खरगे यांच्यावतीने वेणूगोपाळ हे मातोश्रीवर येऊन चर्चा करतील. शरद पवारांबरोबर जशी चर्चा झाली, तशी काँग्रेसच्या नेत्यांसोबत होईल. महाविकास आघाडी, राष्ट्रीय स्तरावर विरोधकांचं ऐक्य हा आमच्यासमोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

चंद्रकांत पाटलांच्या विधानावर अमित शाह नाराज? संजय राऊत म्हणाले…

बाबरी मशिद पाडण्याशी बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचा संबंध नाही, असं विधान भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांचं हे विधान वैयक्तिक मत असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पाटील यांच्या विधानामुळे नाराज झाल्याची माहिती समोर आली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> MSC Bank scam case : ईडीने अजित पवार, सुनेत्रा पवारांची नावं आरोपपत्रातून वगळली -सूत्र

या वृत्ताबद्दल संजय राऊत म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करणाऱ्या मंत्र्यांविषयी तुम्ही दिल्लीला काय कळवता? इथे कारवाई करा. ट्विटरवर टिव टिव करता. अमित शाहांनी जाहीर खडसावलं आहे का? मंत्रिमंडळातून काढलंय का? या हवेतील गप्पा आम्हाला नकोय. आमची मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे आहे. जे स्वतःला शिवसैनिक वगैरे मानतात आणि तसा प्रचार करतात.”

ADVERTISEMENT

राजीनामा मागा नाहीतर, राजीनामा द्या; राऊतांची शिंदेंवर टीका

“हिंमत असले, तर चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा मागा आणि सांगा की होय, आम्ही खरे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचे पाईक आहोत. नसेल जमत तर तुम्ही स्वतः राजीनामा द्या”, असं संजय राऊत म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT