पिंपरी-चिंचवड : धाकधुक वाढली, परदेशातून आलेल्या १० प्रवाशांना कोरोनाची लागण

१३८ पैकी १० प्रवाशांना कोरोनाची लागण, जिनोम टेस्टिंगसाठी नमुने NIV ला पाठवले
पिंपरी-चिंचवड : धाकधुक वाढली, परदेशातून आलेल्या १० प्रवाशांना कोरोनाची लागण

परदेशातून पिंपरी चिंचवड शहरात दाखल झालेल्या १३८ प्रवाशांपैकी १० प्रवासी हे कोरोना बाधित असल्याने त्यांच्या करण्यात आलेल्या विविध चाचण्या या जिनोम टेस्टिंग साठी NIV कडे पाठविण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री राजेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ओमिक्रॉन वायरसने बाधित झालेले ६ रुग्ण आढळल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे व मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्यातर्फे महानगरपालिकत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शहराच्या महापौर सौ. ढोरे यांनी शहरातील नागरिकांना असे आवाहन केले की अशा बातम्यांमुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये तर कोरोना च्या सर्व नियमांचे काठेकोरपणे पालन करावे.

पिंपरी-चिंचवड : धाकधुक वाढली, परदेशातून आलेल्या १० प्रवाशांना कोरोनाची लागण
Corona RTPCR चाचणी 350 रूपयांमध्ये होणार, राज्य सरकारने पुन्हा एकदा घेतला दर कमी करण्याचा निर्णय

यादरम्यान आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, "ओमिक्रॉनने बाधित असलेले ६ रुग्ण सध्या महापालिकेच्या रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. हे 6 बाधित रुग्ण ज्या 13 इतर लोकांच्या संपर्कात आले होते त्यांची ही तपासणी करण्यात आल्यानंतर ते निगेटिव्ह असल्याचे रिपोर्ट ही सादर करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये परदेशातून 138 प्रवासी दाखल झाले होते त्या पैकी 86 प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात आली होती तर त्यापैकी 10 प्रवाशी हे कोरोना बाधित आढळले असून या संशयित रुग्णांचे नमुने जीनोम टेस्टिंग साठी NIV कडे पाठविण्यात आले आहेत त्याचे अहवाल आल्या नंतरच कोणाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे का हे समजू शकेल."

यावेळी आयुक्त पाटील यांनी नागरिकांना घाबरुन न जाण्याचं आवाहन करत नियमांचं पालन करण्याचा सल्ला दिला आहे. ओमिक्रॉनचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज असल्याचंही आयुक्त वाढले.

पिंपरी-चिंचवड : धाकधुक वाढली, परदेशातून आलेल्या १० प्रवाशांना कोरोनाची लागण
Omicron : आता मुंबईत आढळले ओमिक्रॉनचे दोन रूग्ण, महाराष्ट्रातली रूग्णसंख्या 10

Related Stories

No stories found.