PUBG गेमच्या नादात 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या?, राहत्या घरात घेतला गळफास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनीष जोग, जळगाव

जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. बारावीत शिकणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीने इंटरनेटवरील ‘पब्जी’ गेम (PUBG) खेळण्याच्या नादात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही घटना आज (रविवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जामनेरमध्ये घडली असल्याचं समजतं आहे. अवघ्या 19 वर्षीय वयाच्या तरुणीने एका व्हीडिओ गेमच्या आहारी जाऊन अशाप्रकारे विचित्र पाऊल उचलल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी लिहिली सुसाईड नोट-

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे. त्यात तिने असं लिहलं आहे की, ‘मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत असून, यात माझ्या घरच्यांचा किंवा कोणाचाही दोष नाही’ असा उल्लेख केला आहे. ही सुसाईड नोट पोलिसांनी तपासकामी जप्त केली आहे.

हातावर केलेले वार

ADVERTISEMENT

तरुणीचे वडील हे स्वत: पेशाने डॉक्टर असून ते एका स्थानिक डॉक्टरकडे सहाय्यक डॉक्टर म्हणून काम पाहतात. रविवारी सायंकाळी घरात कुणीही नसताना तरुणीने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी तिच्या हातावर वार केल्याने जखमा झाल्याचं आढळून आलं आहे. ही घटना समोर आल्यानंतर जामनेर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली आहे.

ADVERTISEMENT

सतत पब्जी गेमच्या आहारी गेलेली तरुणी?

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी ही सतत मोबाइलमध्ये दंग असल्याचं तिच्या पालकांनी पोलिसांना माहिती दिली आहे. तिच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिचा मोबाइल ताब्यात घेतला. तेव्हा मोबाइलमध्ये पब्जी गेमचे अप्लिकेशन सुरू असल्याचे दिसून आले.

दरम्यान, असे म्हटले जात आहे की, याच गेममुळे तरुणीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असण्याची दाट शक्यता आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण जामनेरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जामनेर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईत PUBG खेळण्यासाठी 16 वर्षांच्या मुलाने आईच्या बँक खात्यातून खर्च केले 10 लाख

सकृत दर्शनी ही आत्महत्या वाटत असली तरी पोलीस आता याप्रकरणी सखोल चौकशी करत आहेत. त्यामुळे तरुणीच्या मृत्यूचं नेमकं कारण काय हे देखील लवकरच समोर येईल.

यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तरुण मुलं-मुली ही देखील Pubg च्या विळख्यात अडकत चालले असल्याचं दिसून येत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT