अकोल्यात रुग्णसंख्या कमी होईना, पाहा दिवसभरात किती रुग्ण सापडले!
अकोला: अकोला जिल्ह्यात आज दिवसभरात 324 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आज सायंकाळी २० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व ११ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील डाबकी रोड, अकोट फैल व कवर नगर येथील प्रत्येकी तीन, जीएमसी क्वॉटर व जीएमसी होस्टेल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बाभुळगाव, […]
ADVERTISEMENT

अकोला: अकोला जिल्ह्यात आज दिवसभरात 324 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आज सायंकाळी २० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व ११ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील डाबकी रोड, अकोट फैल व कवर नगर येथील प्रत्येकी तीन, जीएमसी क्वॉटर व जीएमसी होस्टेल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बाभुळगाव, घुसर, सिंधी कॅम्प, सांगवी बाजार, मलकापूर, तेल्हारा व खडकी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान आज सांयकाळी एकाचा मृत्यू झाला. त्यात हिवरखेड, तेल्हारा येथील रहिवासी असलेला ४५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. १० फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५२, पास्टूल कोविड केअर सेंटर अकोट येथील तीन, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील नऊ, बिहाडे हॉस्पिटल येथील सात, सुर्यचंद्र हॉस्पिटल येथील तीन, ओझोन हॉस्पिटल येथील ११, आयकॉन हॉस्पिटल येथून सहा, युनिक हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून ११, अवघाते हॉस्पिटल येथून एक, नवजीवन हॉस्पिटल येथून सहा, बॉईज हॉस्टेल अकोला येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील एक, सहारा हॉस्पिटल येथील एक, आर्युवेदिक महाविद्यालयातून चार, तर होम आयसोलेशन येथील ११० जणांना असे एकूण २३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
8 मार्च 2021 (कोरोना रुग्णसंख्या अपडेट)