उस्मानाबाद : कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, चार जण जागीच ठार

अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट, चारचाकी गाडीचा अपघातात चक्काचूर
उस्मानाबाद : कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, चार जण जागीच ठार

उस्मानाबाद जवळील आळणी येथे कार आणि कंटेनरच्या झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ४ जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी गाडीचा कंटेनरच्या धडकेने पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात मृत्यूमुखी पडलेले चौघे हे लातूरमधील रहिवासी होते.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उस्मानाबादमधील अळणी पाटी या भागात हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर घेऊन धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरने समोरून येणाऱ्या कारला जोरात धडक दिली. MH 24 AA 8055 असा या कारचा क्रमांक आहे. ही धडक इतकी भीषण होती, की त्याच्यामुळे कार थेट कंटेनरच्या खालच्या भागात शिरली. या भीषण अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

हा अपघात नेमका कसा झाला याबद्दलचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. या अपघातात आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

उस्मानाबाद : कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, चार जण जागीच ठार
चार लेकरांसह आईची विहीरीत उडी मारत आत्महत्या, जालन्यातली धक्कादायक घटना

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in