पुणे: 5 ते 6 जणांच्या टोळक्याकडून बाप-लेकाची हत्या, कोयत्याने केले वार

Pune Double Murder: पुण्यात पाच ते सहा जणांच्या टोळक्याकडून बाप-लेकाची हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना घडली आहे.
पुणे: 5 ते 6 जणांच्या टोळक्याकडून बाप-लेकाची हत्या, कोयत्याने केले वार
5 to 6 youth beat up at lonikand in pune murder of father and son(प्रातिनिधिक फोटो)

पुणे: पुण्यातील लोणीकंद परिसरात 5 ते 6 जणांच्या टोळके केलेल्या बेदम मारहाणीत बापलेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही तरुण हे 22 वर्षीय तरुणाला कोयता आणि बेसबॉलने मारहाण करीत होते. यावेळी मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या वडीलांना देखील त्या टोळक्याने मारहाण केली. या घटनेमध्ये दोघा बापलेकाचा हत्या झाल्याची घटना घडली आहे.

सनी शिंदे (वय 22 वर्ष) आणि कुमार शिंदे (वय 55 वर्ष) अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,लोणीकंद येथे राहणारा सनी शिंदे याला साधारणपणे तीन महिन्यांपूर्वी खुनाच्या प्रकरणामधून जामीन मिळाला होता. तर आज सायंकाळच्या सुमारास सनी आपल्या घराबाहेर बसला होता. तेवढ्यात तिथे आलेल्या 5 ते 6 जणांच्या टोळक्याने कोयता, बेसबॉल आणि दगडाने मारण्यास त्याला सुरुवात केली.

5 to 6 youth beat up at lonikand in pune murder of father and son
Pune Crime : क्षुल्लक कारणावरुन अल्पवयीन मुलांनी केली हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

मुलाला मारत असल्याचे पाहून सनीचे वडील कुमार शिंदे हे त्याला वाचविण्यासाठी गेले. तर त्यांना देखील मारहाण करण्यात आली. या घटनेमध्ये वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रूग्णालयात देखील दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आता या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला असून सध्या हल्लेखोरांचा शोध घेतला जात असल्याचे लोणीकंद पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in