बीड : जीप आणि ट्रकचा भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू

अंबाजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील सायगावजवळ भीषण अपघात
बीड : जीप आणि ट्रकचा भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू
अपघातस्थळी गाडीचा झालेला चेंदामेंदा

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर सायगावजवळ जीप आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. क्रूझर गाडी आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्यामुळे सहा जणांचा जागेवरच मृत्यू झाल्याचं कळतंय. रुग्णालयात उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं कळतंय. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की महिला आणि बालकाचं धड तुटून पडलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर येथील आर्वी गावातून अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे कार्यक्रमासाठी जात असलेल्या गंगणे कुटूंबियांच्या क्रुझर गाडीचा ( क्र . एम.एच. 24 व्ही 8061 ) समोरून येणाऱ्या ट्रक ( क्र.आर.जे. 11 जी.ए .9210 ) सोबत समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. हा अपघात सकाळी साडेदहा वाजता झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या क्रूझर गाडीमध्ये 12 जण प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

हा अपघात इतका भीषण होता की सायगावजवळ अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. अपघातात क्रुझर गाडीतील पाच महिला आणि एक बालक जागीच ठार झाले तर एका पुरुषाचा रुग्णालयात उपाचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांची नावं अद्याप समजू शकलेली नसून अपघातात जखमी झालेल्या लोकांवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघातस्थळी गाडीचा झालेला चेंदामेंदा
'भाऊ-वहिनी संपत्तीत हिस्सा देत नाहीत', सोशल मीडियावर Video शेअर करुन युवकाची आत्महत्या

हा अपघात ओव्हरटेक करण्याचा नादात झाला असल्याची माहिती देण्यात आली असून अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी सुनील जायभाय, बर्दापूर चे एपीआय खरात, अंबाजोगाईचे तहसीलदार विपीन पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

अपघातस्थळी गाडीचा झालेला चेंदामेंदा
devagiri express robbery : 'देवगिरी एक्स्प्रेस'वर दरोडा! मध्यरात्री पोटूळजवळ काय घडलं?

Related Stories

No stories found.