महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रूग्ण, 300 जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा जास्त
भारतात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. दैनंदिन रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होते आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये अनेक विषयांबाबत माहिती देण्यात आली. भारतासह जगभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. जगभरातील मागील आठवड्याभरात 25 लाखांपेक्षा जास्त रूग्ण आढळले आहेत. तर सक्रिय रूग्णांची संख्या 4 कोटी 49 लाखांपेक्षा जास्त झाली […]
ADVERTISEMENT

भारतात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. दैनंदिन रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होते आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये अनेक विषयांबाबत माहिती देण्यात आली. भारतासह जगभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. जगभरातील मागील आठवड्याभरात 25 लाखांपेक्षा जास्त रूग्ण आढळले आहेत. तर सक्रिय रूग्णांची संख्या 4 कोटी 49 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं की जगभरात 115 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
युरोपमधील चार खंड, युके, फ्रान्स आणि अमेरिकामध्ये वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अमेरिकामध्ये 11 जानेवारी रोजी एका दिवसात 11 लाखांपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली.