अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण : AJ च्या अटकेचा थरार; पोलिसांनी केली कामगिरी फत्ते!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Amruta Fadnavis Blackmailng Case:

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना ब्लॅकमेल करून धमकावल्याचा आरोप असलेला बुकी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) याला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी गुजरातमधून (Gujarat) त्याला अटक केली आहे. अमृता फडणवीस यांनी डिझायनर अनिक्षा आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरुद्ध ब्लॅकमेलिंग आणि धमकीप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अनिक्षाला यापूर्वीच अटक केली असून आता अनिल जयसिंघानीच्या देखील मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. (Accused of blackmailing Amrita Fadnavis bookie Anil Jaisinghani finally arrested under Operation AJ)

Operation AJ :

दरम्यान, अनिल जयसिंघानी याच्या अटकेसाठी पोलिसांनी ऑपरेशन AJ आखलं होतं. याबाबत डीसीपी बलसिंग राजपूत यांनी माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, अनिल जयसिंघानिया हा देशातील अव्वल बुकी आहे, त्याचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन आहेत. त्याच्यावर 17 गुन्हे दाखल आहेत, तो बऱ्याच दिवसांपासून फरार होता. त्याला अटक करण्यासाठी ऑपरेशन AJ आखलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यात एकूण 5 टीम तयार करण्यात आल्या होत्या, मात्र इंटरनेट आणि मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपी सतत पोलिसांना चकवा देत होता. अशात पहिलं लोकेशन शिर्डीमध्ये ट्रेस झालं. यावरुन महाराष्ट्रातील 2 टीम शिर्डीत पोहचल्या. मात्र आरोपी तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला. तिथून तो गुजरातला पळून गेला. त्यानंतर आणखी 3 टीम गुजरातमध्ये गेल्या. तिथे बार बोली गावात लोकेशनच्या आधारे शोध घेतला, परंतु तो तिथूनही पळून सुरतला गेला.

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणी मोठी घडामोड, थेट गुजरातमधून अटकेची कारवाई

ADVERTISEMENT

यानंतर अनिल जयसिंघानी सुरतहून भरूचला नंतर वडोदरा आणि त्यानंतर गोध्राला पळून गेला. त्याचवेळी तब्बल 72 तासांच्या खेळानंतर पोलिसांनी अनिल जयसिंघानीला गोध्राजवळून अटक केली. यावेळी त्याच्याकडून अनेक मोबाईल फोन आणि इंटरनेट उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. अन्य कोणी साथीदार आहेत का? याबाबत बोलताना बलसिंग राजपूत म्हणाले, आमचं काम ऑपरेशन एजे अंतर्गत सुरू होतं. अनिल जयसिंघानिया अटक आणि अमृता फडणवीस यांना दिलेल्या ब्लॅकमेलच्या धमकीचा बाकीचा तपास मलबार हिल पोलिस करणार आहेत.

ADVERTISEMENT

काय आहे प्रकरण?

अमृता फडणवीस यांनी गेल्या महिन्याच्या 20 तारखेला डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल यांच्याविरुद्ध मलबार हिल स्टेशन येथे एफआयआर दाखल केला होता. अनिक्षाने तिच्या वडिलांसोबत आपल्याला धमकावून आपल्या विरोधात कट रचल्याचा आरोप अमृता फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत माहिती दिली होती. याबाबत त्यांनी सांगितलेलं की, अनिक्षाने प्रथम अमृताचा विश्वास जिंकला. अनिक्षानेही तिच्या वडिलांबद्दल अमृतालाही माहिती दिली. वडिलांना खोट्या खटल्यात अडकवल्याचा दावा तिने यावेळी केला होता. याप्रकरणी त्यांनी अमृताची मदत मागितली होती.

Amruta Fadnavis यांना 1 कोटीची लाच देण्याची ऑफर; तरुणीला अखेर अटक

अनिक्षाने नंतर अमृताला एक कोटी रुपयांची लाच देऊ केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी अनिक्षाने अमृताला असंही सांगितलं की, ‘तिच्या वडिलांची केस मागे घेतली गेली तर ती त्याला एक कोटी रुपये देईल. पण जेव्हा अमृताने ही गोष्ट करण्यास नकार दिला तेव्हा अनिक्षाने अमृताला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. जर या प्रकरणात मदत केली नाही तर ती तुमचा पती देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात गोवेल.’ दरम्यान, अनिक्षाने अनेक बनावट ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवून अमृताला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचाही तिच्यावर आरोप आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT