दत्तक मुलीचा हात न धरल्याने सनी लिओनी ट्रोल, डॅनिअल स्पष्टीकरण देत म्हणाला....

दत्तक मुलीचा हात न धरल्याने सनी लिओनी ट्रोल, डॅनिअल स्पष्टीकरण देत म्हणाला....

अभिनेत्री सनी लिओनी तिच्या अभिनयामुळे जेवढी प्रसिद्ध आहे तेवढीच तिच्या सोशल मीडियावरच्या फोटोंमुळेही. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय आहे. ती विविध प्रकारचे व्हीडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. तिने दोन मुलांना सरोगसीद्वारे जन्म दिला आहे तर एका मुलीला दत्तक घेतलं आहे. तिने आपल्या कुटुंबीयांसोबत पोस्ट केलेल्या फोटोमुळे ती ट्रोल झाली आहे.

काय आहे प्रकरण?

अभिनेत्री सनील लिओनी तिचा नवरा डॅनियल वेबर यांनी आपल्या तीन मुलांसमवेत एक फोटो पोस्ट केला. या फोटोत तिने मुलगी निशाचा हात धरलेला नाही. एवढंच नाही तर जेव्हा सनी लिओनी तिन्ही मुलांसह घराबाहेर पडते तेव्हा दोन मुलांचा हात पकडते मात्र मुलगी निशाचा हात पकडत नाही. सनी लिओनीचे असे काही फोटो पापाराझी फोटोग्राफर्सनी काढले आहेत ज्यामुळे दत्तक मुलीचा हात का धरत नाहीस असं विचारत सनीला ट्रोल करण्यास अनेकांनी सुरूवात केली.

सनी लिओनी ही नेहमीच तिच्या मुलांसह बाहेर फिरताना दिसते. यावेळी अनेक पापाराझी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढताना दिसतात. पण सनी जेव्हा कधी तिच्या मुलांसोबत बाहेर पडते तेव्हा ती नेहमी तिच्या दोन्हीही मुलांचा हात धरते. पण दत्तक घेतलेल्या निशाचा हात तिने कधीही धरलेला नाही. त्यामुळे सनीने निशाला केवळ प्रसिद्धीसाठी दत्तक घेतले आहे, असे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

सनीने शेअर केलेल्या अनेक फोटोतही तिने तिच्या दोन्हीही मुलांचा हात धरला दिसतो. पण ती कधीच निशाला पकडत नाही किंवा जवळ घेत नाही, असा दावाही नेटकरी करत आहे. सनीच्या या कृतीमुळे तिला ट्रोलही केले जात आहे.

दत्तक मुलीचा हात न धरल्याने सनी लिओनी ट्रोल, डॅनिअल स्पष्टीकरण देत म्हणाला....
सनी लियोनीचं 'मधुबन' गाणं वादात; मथुरेतील पुजारी आक्रमक, गाण्यावर बंदी आणण्याची मागणी

या सगळ्या प्रकरणी सनी लिओनीला प्रचंड ट्रोलिंग सहन करावं लागल्यानंतर तिचा पती डॅनियल वेबर याने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. डॅनियल म्हणाला, 'लोक जे काही समजत आहेत तो मूर्खपणा आहे. मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही. लोक काय विचार करतात याची मला किंवा सनीला पर्वा नाही. माझी दोन मुलां तीन वर्षांची आहेत तर निशा ही सहा वर्षांची आहे. रस्त्यात चालताना नीट कसं चालायचं हे तिला माहित आहे. ती आमच्या घरातली प्रिन्सेस आहे. लोक अशा प्रकारे विचार करून त्यांची मूर्ख विचारसरणी दाखवून देत आहेत.'

सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांनी लातूर येथील अनाथाश्रमातून निशाला दत्तक घेतले आहे. त्यावेळी निशा फक्त 21 महिन्यांची होती. यानंतर 2017 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून सनी ही दोन मुलांची आई झाली. त्यापैकी एकाचं नाव अॅशर आणि दुसऱ्याचं नोआ आहे. पती डॅनिअल आणि तीन मुलं असं सनीचं कुटुंब आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in