स्टँपपेपरवर लिहून देतो मुख्यमंत्री येणार! असं म्हणूनही उद्धव ठाकरे का आले नाहीत? अजितदादांनी दिलं उत्तर..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला आले नाही ज्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली. अधिवेशन जेवढं वादळी ठरलं तेवढीच ही चर्चाही. ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानाला आले नाहीत त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार हे मी काय आता स्टँपपेपरवर […]
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला आले नाही ज्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली. अधिवेशन जेवढं वादळी ठरलं तेवढीच ही चर्चाही. ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानाला आले नाहीत त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार हे मी काय आता स्टँपपेपरवर लिहून देऊ का? मात्र अधिवेशन संपलं तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं दर्शन सभागृहाला झालं नाही. त्यानंतर अजित पवारांना याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवारांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.
देवेंद्र फडणवीसांच्या मदतीला अजित पवार…आणि भास्कर जाधवांनी मागितली माफी
काय म्हणाले आहेत अजित पवार?
मुख्यमंत्री अधिवेशनात येतील असं मी स्टँपपेपरवर लिहून देतो असं म्हटलं होतं. मात्र ते आले नाहीत. मी आज माझे शब्द मागे घेतो. यातला गंमतीचा भाग जाऊद्या. मला एवढंच सांगायचं आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार होते. मुख्यमंत्री पाचही दिवस आमच्या संपर्कात होते. आमच्या दोन कॅबिनेटमध्ये ते व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय झालं? त्या सगळ्या मुद्द्यांची माहिती मुख्यमंत्री घेत होते. मात्र आमच्यातले दोन कॅबिनेट मिनिस्टर काही आमदार हे कोरोनाबाधित झाल्यानंतर आम्हीच त्यांना विनंती केली की मुख्यमंत्री महोदय आज शेवटचा दिवस आहे आणि कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. शेवटी तुमची तब्बेत महत्त्वाची आहे. आत्ताच मुख्यमंत्री एका मोठ्या शस्त्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळेच आम्ही येऊ नका असं त्यांना सांगितलं.