जरंडेश्वर कारखाना प्रकरणात अजित पवारांनी केला सत्तेचा गैरवापर, शरद पवारांनी केलं दुर्लक्ष- शालिनीताई पाटील

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जरंडेश्वर कारखाना प्रकरणी आता शालिनीताई पाटील यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. या कारखान्यावर जी जप्तीची कारवाई करण्यात आली त्यानंतर आता शालिनीताई पाटील यांनी मुंबई तकला सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हेच तेव्हा मंत्रीपदी होते. त्यांनी सत्तेचा गैरवापर करून जरंडेश्वर हा सहकारी साखर कारखाना बळकावला. या कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेकडे शरद पवार यांनीही दुर्लक्ष केलं. या कारखान्याच्या प्रकरणी पवार परिवारतले आणखी सदस्य अडकणार असंही शालिनीताई यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाल्या शालिनीताई?

गुरू कमोडिटीची योग्यता नसताना त्यांना जरंडेश्वर कारखाना विकण्यात आला. त्यांना पुणे मध्यवर्ती बँकेने कर्जही दिलं. 65 कोटींमध्ये हा व्यवहार झाला. गुरू कमोडिटीची पात्रता आहे नसतानाही त्यांना कारखाना का विकत घेऊ दिला याची चौकशी होणं आवश्यक आहे. राजेंद्र घाडगे हे नाव या प्रकरणात येतं आहे ते अजित पवार यांचे मावस भाऊ आहे. राजेंद्र घाडगे यांचं नाव जरी तिथे असलं तरीही सगळा कारभार बघतात अजित पवार. मागच्या चार-सहा महिन्यांपासून ते फिरकले नाहीत. मात्र ते आधी वेळच्या वेळी येत होते. एकदा अजित पवारांना मी एका कार्यक्रमाला बोलावलं होतं. ते माझ्या घरी जेवायला आले होते. त्यावेळी ते म्हणाले की तुमच्या कारखान्याची साईट फार छान आहे. माझ्या कारखान्याच्या जागेची किंमतच हजार कोटी आहे. सगळ्या कारखान्याची किंमत लक्षात घेतली तर साधारण 1500 कोटी होईल. हा कारखाना 65 कोटींना विकण्यात आला. आता तक्रार करायची कुणाकडे? सत्तेत हेच, अधिकारी यांचे. बँकेत सगळं काही यांचंच ठरलेलं असंही शालिनीताई यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आम्ही शेवटी कोर्टात गेलो, त्यानंतर 2019 मध्ये ईडीकडे गेलो. आता ईडीने उशिरा का होईना पण जप्तीची कारवाई केली आहे ही समाधानाची बाब आहे. आमच्या कारखान्याचा कर्जाचा हप्ता भरण्यासाठी थोडा उशीर झाला. त्यावेळी तीन कोटींचा हप्ता शिल्लक होता. असं असतानाही कारखाना विकण्यात आला. आमच्या कारखान्याचं जे अकाऊंट आहे त्या खात्यात आठ कोटींपेक्षा जास्त रक्कम शिल्लक होती. ते पैसे वळवण्यास सांगितलं असता त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आलं. सरकारची आमच्या कर्जाला हमी होती त्यामुळे सरकारकडे जाता आलं असतं. मात्र बँकेत अजित पवार, खरेदी करणारे अजित पवार त्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही. विचारणारं कुणीच नव्हतं त्यामुळे सत्तेचा पुरेपुर गैरफायदा अजित पवार यांनी घेतला. 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार त्या काळात झाला असाही आरोप शालिनीताई पाटील यांनी केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT