अमरावती: झेंडा काढल्याच्या वादावरुन दोन गटात तुफान दगडफेक, संचारबंदी लागू

मुंबई तक

धनंजय साबळे, अमरावती: अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात काल (17 एप्रिल) रात्री 9:30 वाजेच्या सुमारास दुल्ला गेट परिसरातील एक झेंडा काढल्याचा वादावरून दोन गटात हिंसाचार झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात बराच वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेची माहिती मिळताच प्रकरण अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जमाव पांगविला. यानंतर पोलिसांनी अचलपूर आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

धनंजय साबळे, अमरावती: अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात काल (17 एप्रिल) रात्री 9:30 वाजेच्या सुमारास दुल्ला गेट परिसरातील एक झेंडा काढल्याचा वादावरून दोन गटात हिंसाचार झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात बराच वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेची माहिती मिळताच प्रकरण अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जमाव पांगविला.

यानंतर पोलिसांनी अचलपूर आणि परतवाडा येथील बंदोबस्त देखील वाढवला आहे. सध्या अचलपूर आणि परतवाडा या दोन्ही शहरात संचारबंदी (कलम 144) लागू करण्यात आली आहे. याशिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक सुद्धा बोलवण्यात आली आहे.

कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी विनाकारण बाहेर न निघण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. यादरम्यान दोन्ही गटात दगडफेक झाली असून काही वाहनांची तोडफोड सुद्धा झाली आहे.

दरम्यान, सध्या पोलिसांनी परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले आहे. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये अचलपूर शहरामध्ये शांतता आहे. शहरात केवळ रस्त्यावर पोलीस असून नागरिकांना घराबाहेर न निघण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp